धनुष्यबाणावरून पेटला वाद, निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
Shiv Sena Symbol : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Shiv Sena Symbol : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची महिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शिवसनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आयोग या सर्व प्रकरणाची सुनावणी करणार होते. शिवसेना नेमकी कोणाची? शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचं? ही सर्व लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू झाली होती. शिवसेनेशी संबंधित मातोश्री गटाने सांगितले आहे की, अनेक प्रश्न पक्षाशी निगडित हे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्या सर्व प्रश्नाची उत्तरे अजून मिळालेली नाही. सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय होईल, त्यामध्ये पक्षावरती कोणाचं प्राबल्य आहे, याशी संबंधित बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेने आयोगाच्या या नोटिशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचं ठरलं आहे.
निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात उद्या (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करतील. त्यांची पहिली प्रमुख मागणी ही असेल की, आयोगाच्या या नोटिशीला स्थगिती द्यावी. या सर्व प्रलंबित प्रकरणी आधी सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशातच आता शिवसेनेला दिलासा देत आयोगाच्या या नोटिशीमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hasan Mushrif on Eknath Shinde : आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत जाहीर आभार! चर्चा तर होणारच...
Rohit Pawar on NCP : रोहित पवार काल राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यावर बोलून गेले आणि आज केला स्पष्ट खुलासा!
Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा, विरोध न करण्याचं मानेंचं कार्यकर्त्यांना आवाहन