वायकर, प्रभू, सुनिल शिंदे, महायुतीमध्ये कोण येणार? दोन दिवसांत समजेल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला आहे. पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीतील महत्वाचा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
![वायकर, प्रभू, सुनिल शिंदे, महायुतीमध्ये कोण येणार? दोन दिवसांत समजेल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा shiv sena mla Sanjay Shirsat on ashok chavan and mva marathi news update वायकर, प्रभू, सुनिल शिंदे, महायुतीमध्ये कोण येणार? दोन दिवसांत समजेल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/e1523676ecc981e7afb7e47c4635f0fb1701242293867737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला आहे. पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीतील महत्वाचा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरही त्यांनी मोठं वक्तव्य केले.
दोन दिवसांत मोठा नेता येणार -
दोन दिवसांत राज्यातील मोठा नेता महायुतीमध्ये येणार असल्याचेही संकेत यावेळी संजय शिरसाट यांनी दिले. अशोक चव्हाण यांच्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, "आता वायकर, प्रभू, सुनिल शिंदे आणि माजी महापौर यांच्यापैकी कोण येतंय? हे दोन दिवसांत कळेल. " दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadansiv) यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटले होते.
काळजी कऱायची गरज नाही -
अशोक चव्हाण महायुतीमध्ये आल्यानं आमची ताकद वाढली, हे खरं आहे. पण थोडं चुकचुकल्यासारखं वाटणार आहे. कारण जे मिळणार होतं, ते आता थोडं मिळणार आहे. त्यामुळे चुकचुकल्यासारखं वाटरणारच ना, असे संजय शिरसाट म्हणाले. आम्हाला काळजी कऱायची गरज नाही. आमचा बॅास जे करेल ते योग्यच करेल, आमची बार्गेनिंग पॅावर कमी होणार नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले.
अशोक चव्हाण आल्यामुळे ताकद वाढली, पण...
अशोक चव्हाण यांची परिस्थितीनुसार भूमिका बदलत असते त्यामुळे त्यांनी भुमिका घेतली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण महायुतीमध्ये आल्यामुळे ताकद वाढली आहे. पण चुकचुकल्यासारखं वाटतेय. कारण जे मिळणार होतं, ते आता थोडं मिळणार आहे. त्यामुले तसं वाटणं सहाजिक आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
कोल्हापूर काँग्रेसमध्ये अस्वस्थता, अनेक नेते भाजपच्या वाटेवर, खासदार धनंजय महाडिकांचा दावा
कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागलंय. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक म्हणाले.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)