आता भरत गोगावलेंसह 5 आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी, ठाकरे गटाच्या वकिलांचे टोकदार प्रश्न तयार
Shiv Sena MLA Disqualification case : शिवसेना शिंदे गटाच्यावतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे (Rahul Narwekar) सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification case) आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची (Eknath Shinde Shiv Sena) उलट तपासणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्यावतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे (Rahul Narwekar) सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची सलग पाच दिवस उलट तपासणी होत आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आपली साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे हे पुरावे सादर करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबरला साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले.
5 आमदार आणि एक खासदार
आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उदय सामंत (Uday Samant) ,दिलीप लांडे (Dilip Lande) ,योगेश कदम (Yogesh Kadam), भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भरत गोगावले यांची उलट तपासणी
शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची उलट तपासणी आणि साक्ष नोंदवली जाईल. ज्यामध्ये ठाकरे गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारतील.
तर दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आणि रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या इतर पाच आमदार आणि खासदारांना सुद्धा विविध मुद्द्यांवर प्रश्न आणि उपप्रश्न ठाकरे गटाचे वकील करतील.
ठाकरे गटाकडून देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) युक्तीवाद करत आहेत.
सुनील प्रभूंची मॅरेथॉन उलट तपासणी
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची सलग तीन दिवस उलट तपासणी होत आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) हे प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत. 21 जून 2022 च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल करण्यात आले. 21 जूनचा ठराव कधी तयारच केला नव्हता असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी केला. हा दावा सुनील प्रभूंनी फेटाळला.
संबंधित बातम्या