एक्स्प्लोर

Sharad Pawar on Hindi: सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, महत्त्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईन: शरद पवार

Sharad Pawar press conference in Kolhapur: शरद पवार यांनी राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादावर भूमिका मांडली. ठाकरे बंधुंची भूमिका जाणून घेणार.

Sharad Pawar on Hindi Language in Maharashtra Schools: पहिली ते चौथी या प्राथमिक इयत्तांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही. सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करु नये. पण पाचवीपासून हिंदी भाषा येणे, हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. आज देशात 55 टक्के लोक हिंदी (Hindi Language) बोलतात. आज देशात दुसरी कोणतीही भाषा इतक्या मोठ्याप्रमाणावर बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम आणि बंगाली या भाषांचा वापर ठराविक लोकसंख्येकडून केला जातो. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रातील लोक हे हिंदीच्या विरोधात नाहीत. पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्यांच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही. तिथं मातृभाषा महत्त्वाची आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या 5 जुलै रोजी मुंबईतील मोर्चात सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होण्याच्या आवाहनासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मी दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली आहेत. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं समजून घेईन. त्यांनी कार्यक्रम जाहीर केले. त्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं, असे त्यांचे म्हणणे आहे. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांनी काय भाष्यं केलंय हे नेमकं समजून घ्यावं लागेल. कोणीही सांगतो आणि त्यामध्ये सहभागी व्हा, असं करता येणार नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याचा हिताचा असेल तर तो जाणून घेणं, त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांना, 'मोर्चात कोण सहभागी होत नाही, ते बघतोच', या भूमिकेवरूनही मिश्कील टोला लगावला. राज ठाकरेंनी असा का हट्ट का करावा की, सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्दयावर बोलावे. त्यांनी त्याला क्रिकेटबद्दल विचारावं. बघून घेतो हे, राज ठाकरे यांचं बोलणं योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar on Thackeray brothers alliance: राज-उद्धव युतीवर शरद पवारांचं भाष्य

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही, हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत, असे शरद पवारांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा

राज-उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र येण्याची चाहूल लागताच भाजपचं मोठं पाऊल, मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget