![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांनी कारण उलगडून सांगितलं
Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल, यावर भाष्य केलं.
![Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांनी कारण उलगडून सांगितलं Sharad Pawar said ruling parties may get minimum advantage of Ladki Bahin Yojana but not came in power Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांनी कारण उलगडून सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/48216162c47eec584491ccf37c2195961726670994000989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्प जाहीर करताना विविध योजनांची घोषणा केली होती. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. या योजनेमुळं सत्ताधारी पक्षांना आगामी निवडणुकीत फायदा होईल की नाही याबाबत चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीबीसी मराठी ला दिलेल्या मुलाखतीत लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या, आता तिसरी टर्म सुरु आहे, इथं येऊन योजनेचं कौतुक करुन गेले, त्या काळात त्यांना बहिणींच्या व्यथा अन् दु:ख दिसलं नाही का असा सवाल शरद पवार यांनी केला.. उद्धव ठाकरेंच्या सरकारचा काळ सोडता इथं त्यांची सत्ता आहे, त्या काळात बहिणींचं दु:ख दिसलं नाही का, असा सवाल देखील शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांनी यासंदर्भात पुढं बोलताना राज्यातील महिलांना सुरक्षा गरजेचं असल्याचं म्हटलं. याशिवाय राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील, असंही ते म्हणाले. रोजचं वर्तमान पत्र बघितलं तर स्त्रीयांवर अत्याचार ही बातमी नित्याचीच झालेली आहे आणि ती क्लेशदायक आहे.खऱ्या अर्थानं बहिणींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, वाढलेले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण योजनेचा किती परिणाम होईल?
शरद पवार पुढं म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचं म्हणतात, अजून दोन हप्ते देतील.लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही.समाजात , लोकांच्यात, बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, महागाई, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाच्या बाबत भरीव कामगिरी आहे असं दिसत नाही, या गोष्टींचा बहीण विचार करेल असं दिसतं, असं शरद पवार यांनी सांगितलं.
गावागावात जातो, मेळावा घेतो, बहिणींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षानं मांडतात, लाडकी बहीणचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)