एक्स्प्लोर

Sharad Pawar's NCP first candidate list : शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या नेत्यांना संधी?

Sharad Pawar's NCP first candidate list announced : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

Sharad Pawar's NCP first candidate list announced : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. 

कोणाला कोठून उमेदवारी 

वर्धा     - अमर काळे
दिंडोरी   - भास्करराव भगरे
बारामती -सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके

अमर काळे आणि निलेश लंकेंना संधी 

नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमर काळे आणि निलेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. निलेश लंके यांना अहमदनगरमधून तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत. 

भारती पवार यांच्याविरोधात भास्कर भगरे यांना उमेदवारी 

दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून  भास्कर भगरे यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिंडोरी लोकसभेसाठी पुनश्च भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा तिढा सुरू होता. अनेक इच्छुक असल्याने उमेदवार जाहीर केला जात नव्हता आज अखेर दिंडोरी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार भास्कर भगरे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली. 

सुप्रिया सुळे चौथ्यांदा मैदानात 

जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सु्प्रिया सुळे यांची सुनेत्रा पवार यांच्या लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तर अमोल कोल्हे यांना शिरुरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्याशी लढत होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 जणांचा समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget