एक्स्प्लोर

शरद पवारांना मतदानानंतर 16 दिवसांनी बारामतीमधील विजयाची चाहुल लागली? सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात.

Sharad Pawar on Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती : यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे, विशेषतः महाराष्ट्रात (Maharashtra Politicle Updates). शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळी आणि राष्ट्रवादीत (NCP) पडलेली उभी फूट यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक (Maharashtra Lok Sabha Election 2024) निकालांकडे लागलं आहे. अशातच निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच महाराष्ट्रातील एका मतदारसंघाची जबरदस्त चर्चा रंगलेली. तो म्हणजे, बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha Election Result 2024). बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात. अशातच शरद पवारांनी बारामती लोकसभा निकालांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

खात्री असायला हरकत नाही : शरद पवार 

बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही." 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच; शरद पवारांचा दावा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा शरद पवारांनी केला आहे. राज्यातील एनडीएला जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एनडीएमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनी साथ सोडून भाजपसोबत गाठ बांधली आहे. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अशातच यावेळची लोकसभा निवडणूक ही काका-पुतण्यामधील प्रतिष्ठेची लढाई असल्याचं बोललं जातंय. सर्वाधिक चर्चा आहे ती, बारामतीच्या लोकसभा जागेची. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ही जागा लढवली होती. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या येथून खासदार असून त्याही रिंगणात आहेत. या जागेवर नणंद-भावजय यांच्यातील लढत राज्यातील हायव्होल्टेज लढत म्हणून पाहिली जात आहे. 

विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवार म्हणाले... 

लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे... असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं." 

दरम्यान, अजित पवारांनी थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपप्रणित महायुतीसोबत गाठ बांधली. बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण महायुतीकडून कोण? अशा चर्चा रंगलेल्या. अशातच महायुतीनं मोठा डाव टाकत बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे बारामतीतील नणंद-भावजयमध्ये रंगलेली लढत चर्चेचा विषय ठरली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sharad Pawar on BJP: लोकसभेत भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाहीतर, पाठिंबा देणार का? शरद पवार म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget