एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Sharad Pawar: देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

Devendra Fadnavis and Sharad Pawar: क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही.

Devendra Fadnavis and Sharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख नेतृत्त्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी वैचारिक मतभिन्नतेमुळे शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर अनेकदा टीका करताना दिसतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने तारीफ केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट असल्याचे मत शरद पवार यांनी या पुस्तकातील लेखात नोंदवले आहे. (Devendra Fadnavis Birthday) 

दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे ! अन् बोलायचंच म्हटलं तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसे काय नाकारता येईल ? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला 'मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो' तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून 'ते थकत कसे नाहीत?' असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे. देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाची, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला, त्यांनी केलेल्या कामांचा ऊहापोह कॉफी टेबलबुक मध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, अशी स्तुतीसुमने शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर उधळली आहेत.

Sharad Pawar: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना महत्त्वाचा सल्ला

पूर्वीचे राजकारण आणि आजचे राजकारण फार बदललेले आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये वाद-प्रतिवाद होत, कलगीतुरे रंगत असत पण निवडणुका संपल्या की, सत्ताधाऱ्यांना संरचनात्मक आणि सकारात्मक कार्याकडे, समाजकारणाकडे वळता येई. आजकाल असे होत नाही. राजकारण ही सततची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डाव-प्रतिडाव, कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. मतभेदांनी टोक गाठले आहे. त्यामुळे नकारात्मक, प्रतिक्रियात्मक कार्यासाठी उर्जेचा व्यय होतो. त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो.

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा. जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा वाढदिवासानिमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद, असे शरद पवार यांनी या लेखात म्हटले आहे.

आणखी वाचा

विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट

महत्त्वाच्या बातम्या

Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget