Sharad Pawar on Amit Shah : दंगली प्रकरणी सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल
Sharad Pawar on Amit Shah, छत्रपती संभाजीनगर : "ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे, त्यांच्या विचारात बदल झालेला नाही. आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत"
Sharad Pawar on Amit Shah, छत्रपती संभाजीनगर : "ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे, त्यांच्या विचारात बदल झालेला नाही. आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत. आश्चर्याची बाब आहे. गुजरात दंगल झाली होती. त्यावेळी कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शहाला तडीपार केलं होतं. तोच माणूस आज देशाचा गृहमंत्री म्हणून देशाचं रक्षण करत आहे", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लेखक शेषराव चव्हाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) शरद पवारांचा उल्लेख 'भ्रष्टाचाराचे सरदार' असा केला होता. त्यानंतर शरद पवारांनी आज शाहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केलाय.
माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे, मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही
एकदा मोदी म्हणाले शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, पण माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असा टोलाही शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.
मी निर्णय घेतला, पण नव्या पिढीला विश्वासात घेणं गरजेचं होतं
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र सरकारची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर मी एक निर्णय घेतला होता. तो निर्णय होता असा होता की, येथील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात होता. निर्णय जाहीर झाला. तेव्हा रात्री 2 वाजेपर्यंत इथल्या पोलीस कमिश्नराचे मेसेज आले की हल्ले होऊ लागले आहेत. दलितांचे घरे जाळले जात आहेत. लोकांना हा निर्णय अजिबात मान्य नाही. काहीना काही करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकर या देशाला संविधान देणारे होते. जगभरात त्यांचे नाव होते. त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरु होणे ही काही चुकीची गोष्ट नव्हती, पण परिस्थिती कठिण झाली होती की, आम्हाला निर्णय स्थगित करावा लागला. त्यानंतर मला माझी चूक लक्षात आली. मी निर्णय घेतला, पण नव्या पिढीला विश्वासात घेणं गरजेचं होतं. हे काम माझ्याकडून झाले नाही. त्यानंतर मी मराठवाड्यातील जेवढे कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये गेलो आणि तरुणांशी संवाद साधला. तेथे जाऊन मी तरुणांना आणि लोकांना या निर्णयासाठी तयार केले. आज मला आनंद आहे की, विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहे.
Jayant Patil on Raj Thackeray : राज ठाकरे स्वतःसाठी लढतात का? दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी लढत असतील, जयंत पाटलांचा टोला; विधानसभेच्या जागाही सांगितल्या