शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेटीला, सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग
Sharad Pawar Meets Dilip Sopal, Barshi : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेट घेण्यासाठी गेले आहेत.
Sharad Pawar Meets Dilip Sopal, Barshi : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेट घेण्यासाठी गेले आहेत. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी (Barshi) दौऱ्यावर असेलेल्या शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी शरद पवारांसोबत विजयसिंह मोहिते पाटिल, खासदार धैर्यशील मोहिते पाटिल हे देखील उपस्थित आहेत.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपल यांची बार्शीत भेट
दिलीप सोपल हे अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपल यांची बार्शीत भेट घेतली आहे. बार्शी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, 2014 च्या मोदी लाटेतही शरद पवारांनी हा गड राखला. मात्र आमदार दिलीप सोपल यांनी 2019 च्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.
2019 च्या विधानसभेत सोपल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीने निरंजन भूमकर यांना बार्शीतून संधी दिली होती. या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून परभवाचा सामना सहन करावा लागलेला होता.
शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली
बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली. शेतकरी मेळव्याच्या निमित्ताने बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली. यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत स्वागत केले. प्रभावती झाडबुके यांनी 1962 ते 1972 या काळात विधानसभेत बार्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आज भाषणात ही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर प्रभावती झाडबुके यांची घरी जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली.
शरद पवार म्हणाले, आज या देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किमत मिळत नाहीये. म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे. माझ्याकडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यावधीचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो. आज मोदी साहेबांचे राज्य, या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेला तरुण नोकरी मिळतं नसेल. तर निराश तरुण आपल्याला देशभरात दिसतय. जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचे चित्र ही नैराश्य दिसतं.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या बार्शीतील शेतकरी संवाद सभेदरम्यान, मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले