(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवार पंतप्रधानच काय ते या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही, त्याचे त्यांना दुःख अन् वेदना; सुधीर मुनगंटीवारांची टीका
शरद पवारांना देशाचे पंतप्रधानच काय त्यांना या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनता आले नाही, त्याचेच त्यांना दुःख अन् वेदना असून त्यातून ते असे भाष्य करतात. अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर केलीय.
Sudhir Mungantiwar : जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याकरिता मदत करत नाही. त्यांच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केल्या जातं, किती दिवसापासून पवार साहेब (Sharad Pawar) पंतप्रधान बनणार असे, म्हणत होते. परंतु पंतप्रधान तर सोडाच त्यांना या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनता आले नाही. परिणामी, याचेच त्यांना दुःख आणि वेदना असून शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी ते असे व्यक्त होत असतात. अशा शब्दात राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली आहे.
आपण कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे नेते होतो. जेव्हा सात खासदाराच्या भरोशावर नेते बनण्याचा प्रयत्न करतो, मात्र या प्रयत्नात जेव्हा आपल्याला सफलता मिळत नाही, तेव्हा देशाच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे नैतिक अध:पतनाची सुरुवात झाल्याची लक्षणे आहे. असा टोलाही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शरद पवारांना लगावला आहे.
काही लोकांचे स्वप्न बघण्यात आयुष्य निघून गेलं
संविधानात कोणतीही तरतूद नाही की कोणी स्वप्न बघू नये, त्यामुळे त्यावर संशय घेण्याचं काही कारण नाही. काही लोकांचे स्वप्न बघण्यात आयुष्य निघून जातो. अनेक लोकं स्वप्न बघतात परंतु त्या स्वप्नात जनतेची सेवा करण्याच संकल्प नसेल तर याला आपण हसीन सपने म्हणतो. संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना नायक म्हणतील तर त्यांना सामना आणि पक्षातून काढून टाकतील, त्यांना मी शरद पवारांचा अजूनही नाही तर तुमचाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी म्हणावं लागतं. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी खलनायक म्हणून संबोधल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी हे भाष्य करत टीका केली आहे.
सरकार लाईव्ह चर्चा करेल अगोदर तुमची काय भूमिका ते सांगा
मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय? मराठा आरक्षण द्यायची तुमची नव्हती, आता भूमिका बदलली तर स्वतंत्र आरक्षण द्यायचं की ओबीसी मधून आरक्षण द्यायचं, हे एकदा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने सांगावे. खरा चेहरा समोर आला तर महाविकास आघाडीची अडचण होईल. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.निवडणुक कार्यक्षमतेच्या आधारावर झाली पाहिजे. जातीच्या आधारावर निवडणुका व्हायला सुरुवात झाली तर बाकी जातीने कुणाकडे पहावा. जात घराच्या उंबरठ्याच्या आत राहावी. असेही ते यावेळी म्हणाले. काही लोक जातीच्या शिडीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत जाण्याचं स्वप्न पाहतात. आपल्या देशातील एकता, समरसता स्वतःच्या खुर्चीच्या स्वप्नासाठी संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
तीनदा खोटं बोलल्यावर नंतर ते खरं वाटू लागतं
मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही निश्चित थोडे बेसावध राहिलो. मतदारापर्यंत खोटा निगेटिव्ह पोहोचवला तर लोक विश्वास ठेवणार नाही, असा आमचा तर्क होता. मात्र जोशेप बोबेल म्हणायची तीनदा खोटं बोलल्यावर नंतर ते खरं वाटू लागतं, कदाचित ते पुस्तक त्यांनी वाचला असेल आणि प्रत्येक बाबतीत खोटं निरेटिव्ह सुरू केलं. तसेच सत्तेची अघोरी भूक भागवण्याचा या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला होतो. तर दुसरीकडे सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार संवेदनशील असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हे ही वाचा