Raj Thackeray : शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पाळत नाहीत; मी बोलल्यानंतर मंदिरात जातायत : राज ठाकरे
Raj Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नास्तिक आहेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
Raj Thackeray on Sharad Pawar, मुंबई : "शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पळत नाही. त्यांच्या मुलीने देखील सांगितलं आहे. मी बोलल्यावर ते प्रत्येक मंदिरात जायला लागले. त्यांचं हात जोडणे देखील खोटे आहे", असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचा मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
समुद्रात महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा हेच हजारो कोटी गड किल्ल्यांवर खर्च करा
राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्रात उद्योग कसे येतील, हे पाहात नाहीत. काम कसे येईल हे नाही तर फुकट पैसे वाटत सुटले आहेत. समुद्रात महाराजांचा पुतळा उभारायचा, काही वर्ष आधी विनायक मेटे यांनी तो विषय घेतला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा उभारायचा. मला शिल्पकला माहित आहे, म्हणून बोलतो, तो घोडा किती उंच असेल? वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चायनामधून बनवून आणला आहे. जर महाराजांचा पुतळा उभारायचा असेल तर समुद्रात भर किती टाकावी लागेल? सिंधुदुर्गात तो पुतळा पडला. उद्या तुम्ही टाकलेला भराव पडला आणि पुतळा पडला तर? समुद्रात शिव छत्रपतींचा पुतळा उभारण्यापेक्षा हेच हजारो कोटी गड किल्ल्यांवर खर्च केले तर भविष्यात सांगता येईल की आमचा राजा कोण होता. औरंगजेबाला त्याची लायकी दाखवली,आमच्या राजाने त्या मोठ्या राजाला इथे आणला. 6 बाय 4 फुटत गाडला. खोटं सांगायचं, काहीही सांगायचं,असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही
एक महाराष्ट्राची भाषा, हे प्रवक्ते काय बोलतात, घाणेरडे सर्वांना बोलता येते पण कुठे बोलायचे? मला भीती हीच वाटते लहान लहान मुलांना वाटेल हेच राजकारण असते, उद्या ते म्हणायला लागतील. ही दिशा नाही ही दशा आहे. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या. कारण तुमचे पैसे आहेत, आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही. अदानी तुमचे विमानतळ घेतो, पोर्ट घेतो, कोकणातील एक जमीन घेत आहेत. गुजरातमध्ये शेतकऱ्याला जमीन शेतकऱ्याला विकावी लागते. महाराष्ट्रात खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, आकडेवारी सांगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या