एक्स्प्लोर

आम्ही साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक लढणार, शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा फेटाळली

Sharad Pawar camp: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा आज सकाळपासून सुरु होती. अशातच शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या नेत्याच्या वक्तव्याने संभ्रम पसरला होता.

पुणे: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्त्वाखाली लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. कालपासून शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जात होते. अशातच बुधवारी पुण्यात शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. परंतु, आमचा पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केले.

शरद पवार यांनी बुधवारी सकाळी राज्यभरातील नेते, खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे. शरद पवार साहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मूळ चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले नाही तर आम्ही पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह घेऊन लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. तेच अस्तित्त्व घेऊन आम्ही विधानसबा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

आम्ही दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, या चर्चेत काहीही तथ्य नाही. या बातम्या साफ चूक आहेत. आमची आजची बैठक पक्षाचे चिन्ह आणि नाव काय असू शकते, यासंदर्भात होती. पण आम्ही बॅकफूटवर आलो असा समज पसरण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार,  अशा बातम्या जाणीवपूर्व पेरल्या जात आहेत, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमधे सत्यता नाही: अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहील.  राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्यच्या बातम्या तथ्यहीन.  या बातम्या कोण पेरतंय याचा शोध घ्या.  जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जातायत अस वाटते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सभेबाबत चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली. तर अनिल देशमुख यांनीही यावर स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमधे सत्यता नाही. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढण्याचा तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आहोत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

आणखी वाचा

सोबत या, पक्ष विलीन करा, एकाच चिन्हावर लढू; काँग्रेसचा शरद पवारांना मोठा प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget