TP Munde on Sharad Pawar : शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं, अनेकांची घरं फोडली, आता सगळं फेडावं लागतंय; टीपी मुंडेंचा हल्लाबोल
TP Munde on Sharad Pawar : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत जायचे असते. परंतु सध्या पवार घरात काय चाललंय? शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं.
TP Munde on Sharad Pawar : "सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत जायचे असते. परंतु सध्या पवार घरात काय चाललंय? शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं. तुमचं घर फुटलं याच दुःख तुम्हाला आहे. पण तुम्ही जे पेरलं तेच उगवलं आहे. आता या वयामध्ये ही फेड आहे. लाखोंची घरे उदवस्त केली. याचे पाप आहे आणि त्याची ही फेड आहे", असं ओबीसींचे नेते टीपी मुंडे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीने महेश भागवत यांना उमेदवारी जाहीर केली. महेश भागवत यांच्या प्रचार सभेसाठी टीपी मुंडे आणि प्रकाश शेंडगे केडगाव चौफुला येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी यावेळी ते बोलत होते.
आजपर्यंत 15 वर्षात काय कामे केली?
टीपी मुंडे म्हणाले, गरीबांना गरीब करणे, श्रीमंतांना श्रीमंत करणे. नातेवाईकांना पद दिले. मात्र, धनगर, माळी आणि छोटे छोटे समाज आहेत यांचे काय? बारामतीची लेक आहे असं म्हणता परंतु पवार साहेबाची लेक आहे. आजपर्यंत 15 वर्षात काय कामे केली? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.
जरांगे नावाच्या भुताने थैमान घातले
पुढे बोलताना टीपी मुंडे म्हणाले, जरांगे नावाच्या भुताने थैमान घातले. सर्वसामान्य माणूस घराबाहेर निघत नव्हता. छगन जबळ ,प्रकाश शेंडगे आणि माझ्याबरोबर अनेक जणांना साक्षात्कार झाला आणि ओबीसी आंदोलन उभं केलं. मराठा समाज लोकसंख्या 15 टक्के आणि खासदार 35 टक्के आहे. आम्ही यांना साथ दिली. जरांगे यांचे ऐकून आमच्यावर अन्याय केला गेला. आता यांची मस्ती जिरवायची वेळ आलीय. प्रकाश शेंडगे म्हणाले,बारामती लोकसभा उमेदवार घोषणा केली. ते भागवत नव्हे तर ते हे भागवत आपले आहेत. बीड जिल्ह्यात ओबीसी समाजावर हल्ला झाला. हल्ला करणारे मराठा समाजाचे होते. आज बारामती प्रचाराचा नारळ फुटला नाही तर बहुजन समाजातील राजकीय लढाईला सुरवात झाली आहे.
आमची लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे
पुढे बोलताना शेंडगे म्हणाले, आमची लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे. दोन नणंद आणि भावजय लढत आहेत. आम्हाला याच काही देणं घेणं नाही. एकेकाळी पवार कुटुंब देशात प्रस्थापित होत. मागच्या वेळी मतांची विभागणी झाली नव्हती. मराठा आरक्षण लढा सुरू झाला. अनेक घरे जाळण्यात आली. हे सर्व पोलिसांसमोर झालं. भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या