मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं? मोदींच्या कौटुंबिक टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
Sharad Pawar Response to PM Modi : मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौटुंबिक वादावरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर कुटुंब सांभाळण्यावरून निशाणा साधला होता. पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, मग देश काय सांभाळणार या मोदींच्या टीकेला पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जळगावमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या कौटुंबिक टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौटुंबिक टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आपल्याला त्यांच्या बद्दल माहितीय, त्यांनी कुठे कुटुंब सांभाळलंय. त्या पातळीला मी जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली, तर ती अतिशय चिंताजनक आहे. पण, असं आपण व्यक्तिगत बोलू नये. ते कर्तव्य त्यांनी पाळलं नाही, पण आपण ते कर्तव्य न पाळण्याची भूमिका घेऊ नये, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घ्यायची वेळ येऊ नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं की, बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून मला उद्धव ठाकरेंचा आदर आहे, त्यांना भविष्यात अडचण आली, तर त्यांच्.या मदतीला धावणार मी पहिला असेन. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर टीका करताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, त्यांनी लाख म्हटलं असेल, पण आमची प्रार्थना ही आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घ्यायची वेळ येऊ नये.
पंतप्रधानांना आत्मविश्वास नाही, म्हणून सतत महाराष्ट्रात सभा
राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आठ ते नऊ जागा मिळतील, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला आहे. तर पंतप्रधान मोदींच्या प्रचारा दरम्यान सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुनही पवारांनी निशाणा साधलाय. पंतप्रधान सतत महाराष्ट्रात येतायेत, म्हणजे त्यांना आत्मविश्वास नाही.' असंही शरद पवार म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं ? कौटुंबिक टीकेवरून पवारांचा पलटवार
महत्त्वाच्या इतर बातम्या :