एक्स्प्लोर

Sharad Pawar Collar Video : उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग, थाटात उडवली कॉलर, साताऱ्यात निवडणुकीची कुस्ती रंगणार!

शरद पवारांनी सातऱ्यात जाऊन थाटात कॉलर उडवली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सातारा : या मतदारसंघातील मविआचे (MVA) उमेदवार श्रीनिवास पाटलांनी (Srinivas Patil) निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यावर असताना पाटलांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांच्याशी दोन हात कोण दोन हात करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, साताऱ्यात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झालेले असतानाच शरद पवार यांनी मात्र सातारच्या भूमित थाटात कॉलर उडवली (Sharad Pawar Collar Video) आहे. कॉलर उडवून त्यांनी एका प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे. पवारांच्या या कृतीचा व्हिडीओस सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. 

श्रीनिवास पाटलांची माघार

राज्यात महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी वाद असलेल्या जागांवर मविआ आपले उमेदवार जाहीर करू शकते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. महायुतीकडून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. उदयनराजे हे साताऱ्यातील बलशाली नेते आहेत. असे असताना श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यामुळे मविआसमोर पेच निर्माण झाला आहे. पण शरद पवार मात्र नेहमीप्रमाणे आपले राजकीय कौशल्य वापरून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

थाटात उडवली कॉलर

महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना चांगलाच खटाटोप करावा लागला. ते काही दिवस दिल्लीत मुक्कामी होते. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते, असा दावा केला जात होता. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे काहीही बोलणे झालेले नाही, असे पवार यांनी सांगितले. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही हातांनी थाटात कॉलर उडवली. पवारांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनादेखील हसू आवरले नाही.

उदयनराजेंची स्टाईल महाराष्ट्रभर प्रसिद्ध 

उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. ते भर सभेत, पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या कार्यक्रमात थाटात कॉलर उडवतात. उदयनराजेंनी कॉलर उडवताच (Udyanraje Collar Video) प्रेक्षकांतून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतात. उदयनराजे हे नेहमीच बिनधास्त आणि स्टाईलने वावरत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात थाटात कॉलर उडविणारा नेता अशी उदयनराजे यांची ओळख आहे. मात्र याच उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यात जाऊन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हातांनी कॉलर उडवली आहे. 

शरद पवारांनी अशी उडवली कॉलर, पाहा व्हिडीओ :

सातारच्या मातीत निवडणुकीची कुस्ती रंगणार

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून उदयनराजेंना पाडण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे, असे अनेकजण म्हणत आहेत. शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या या कृतीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. सातारच्या मातीत प्रचारसभांचा धुरळा उडायचा अद्याप बाकी आहे. त्याआधीच पवारांनी थेट कॉलर उडविल्यामुळे साताऱ्याची निवडणूक रंगतदार होणार, असे म्हटले जात आहे.  

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Shiv Sena Symbol Case : शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget