Sharad Pawar : पोर्शे प्रकरणाला जबाबदार व्यक्तींची मदत करतो, सत्तेची मस्ती चढलीये, तुझा निवडणुकीत बंदोबस्त करु, शरद पवारांचा टिंगरेंवर हल्ला
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Sharad Pawar on Sunil Tingre, पुणे : "सुनील टिंगरे (Sunil Tingre) तू कुणाच्या पक्षातुन निवडुन आलास? हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहितीये. तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, पण कल्याणी नगरला भयंकर अपघात झाला. दोघांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्यांना हा आमदार मदत करत होता. तू मतं पक्षाच्या नावाने मागितली . माझ्या नावाने मतं मागितली आणि आमदार झाल्यावर लोकांना मदत करण्याऐवजी चुकीचे काम करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यांना सत्तेची मस्ती चढलीय" असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते पुण्यातील (Pune) खराडी (Kharadi) येथील सभेत बोलत होते. यावेळी सुनील टिंगरे यांचे विरोधक बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि दहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटात असलेले आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापू पठारेंची उमेदवारी शरद पवार जाहीर करणार आहेत. या सभेत शरद पवार बोलत होते.
मी निर्धार केला विधानसभेला आपण चित्र बदलायचे
शरद पवार म्हणाले, मागील वेळी लोकसभेला आम्हाला फक्त चार आणि काँग्रेसला एक जागा मिळवली होती. पण मी निर्धार केला की विधानसभेला आपण हे चित्र बदलायचे आणि लोक उभे राहिले. आता तर लोकसभेला आपण 31 जागा जिंकल्यातच. मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू 14 वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांची हत्या झाली. राजीव गांधींनी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यांची हत्या झाली. ही साधीसुधी माणसे नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केले?
आज पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयता गँग
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांनी पाऊस आला म्हणून म्हणून पुण्यातील सभा रद्द केली. पण आम्ही ठरवलं की पाऊस आला तरी सभा घ्यायची. पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयता गँग... पुण्याच वैशिष्ट्य आधी काय होतं तर बजाजचा कारखाना , किर्लोस्करांचा कारखाना , विद्येचे माहेरघर आणि आज काय तर कोयता गँग, असं शरद पवार यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Umesh Patil on Rajan Patil : 'लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगल्याचा अभिमान...' उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्ला