Umesh Patil on Rajan Patil : 'लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगल्याचा अभिमान...' उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्ला
Umesh Patil on Rajan Patil : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये.
Umesh Patil on Rajan Patil, Mohol : सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील कट्टर विरोधकांचा वाद थांबता थांबत नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचं अध्यक्षपद दिलं आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जाही दिला. त्यामुळे त्यांच्या पक्षातील उमेश पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राजीनामा देण्याची भाषा करत राजन पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देत अजित पवारांकडून मोहोळचा गड राखण्याचा प्रयत्न
अजितदादा हाच पक्ष म्हणून कायम साथ देणारे उमेश पाटील राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत का पोहोचले? असा सवाल निर्माण झालाय. कारण काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजन पाटील यांच्या उपस्थित मोहोळमध्ये सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी राजन पाटलांना झाप झाप झापलं होतं. मात्र, अजित पवार इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जाही दिला. त्यामुळे उमेश पाटलांच्या नाराज झाले आहेत, मी राजीनामा लिहून ठेवला असल्याचे ते म्हणाले आहेत.
उमेश पाटील काय काय म्हणाले?
लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतोय याचं वाईट वाटतं आहे. ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्षपद बहाल केले गेले आहे. अजितदादांवर नेमकी काय जादू केलीय याची मलाही माहिती नाही, पण अजितदादांनी मला बैलगाडी खालचा कुत्रा म्हणून संबोधलं याचं वाईट वाटलं नाही. मात्र जरं पक्षाला माझा त्रास होतं असेल तर मी माझा राजीनामा तयार ठेवलाय, असंही उमेश पाटील म्हणाले.
अजितदादा हाच पक्ष म्हणणारे उमेश पाटील राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत का पोहोचले??
मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांचा वाद चिघळलाय. माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिलाय. "लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतय याचं वाईट वाटतं.ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेलंय अजितदादांवर नेमकी काय जादू केलीय याची मलाही माहिती नाही",अशी टीका उमेश पाटील यांनी केलीये.