एक्स्प्लोर

" 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला", अजितदादांच्या पत्रावर शरद पवार गटाचा करारा जवाब

Sharad Pawar: 100 दिवसांचं कर्तृत्त्व सांगावं लागणं म्हणजे तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येते, अशीही टीका शरद पवार गटाने केली आहे. 

मुंबई सत्तेत सामील झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त अजित पवार (Ajit Pawar Letter)  यांनी लिहिलेल्या पत्राला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar)  प्रत्युत्तर दिलं आहे. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण अशी टीका शरद पवार गटाने केली आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मराठी अस्मिता गहाण ठेवली आहे. 100 दिवसांचं कर्तृत्त्व सांगावं लागणं म्हणजे तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येते, अशीही टीका केली आहे. 

पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले 100 दिवस गहाण ठेवला आहे. कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व  शरदच पवारांमध्ये आहे, असे देखील म्हटले आहे. 

काय म्हटले शरद पवार गटाने?

  • 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण....
  •  100  दिवस छत्रपती - फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे
  •  100 दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे
  • 100 दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे
  •  100  दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे
  • 100 दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्रविरोधकांसोबतचे
  • 100 दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे 
  • 100 दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे
  •  100 दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षण विरोधकांसोबतचे...
  • 100 दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे....
  • 100 दिवसांचं कर्तृत्त्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे.....

काय म्हणाले होते अजित पवार?

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार गटाला 100 दिवस पूर्ण झाले  यानिमित्तानं अजित पवारांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले होते.  पत्रात अजित पवारांनी स्वत:चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला.तसेच सरकारमध्ये सहभागी होण्यामागची भूमिकाही अजित पवारांनी स्पष्ट केलीय.. यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख करताना शरद पवारांचं नाव घेणं मात्र टाळले.  टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे, असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेत, असेही अजित पवार म्हणाले. मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामामार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे, यावर माझा विश्वास आहे, असे देखील अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा :

 पुणे जिल्हा बँकेचे मोठं पद सोडलं, अजित पवारांचा निर्णय नेमका कशासाठी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : शाळकरी लेकी भयग्रस्त; राज ठाकरे थेट पोहोचले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात, मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी
शाळकरी लेकी भयग्रस्त; राज ठाकरे थेट पोहोचले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात, मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी
Onion Market : शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार! 'बफर स्टॉक'चा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली, शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध
शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार! 'बफर स्टॉक'चा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली, शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध
ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणावर अलहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी, नक्की वाद काय?
ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणावर अलहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी, नक्की वाद काय?
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaKolhapur :  ABP Majhaच्या कॅमेरामनला धक्काबुक्की; कोल्हापूरकर आक्रमकRitwik chatterjee Pune  : बदलापूरमधील दुर्घटनेनंतर बाल मानसोपचार तज्ज्ञांचा पालकांना सल्ला काय ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : शाळकरी लेकी भयग्रस्त; राज ठाकरे थेट पोहोचले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात, मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी
शाळकरी लेकी भयग्रस्त; राज ठाकरे थेट पोहोचले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात, मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी
Onion Market : शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार! 'बफर स्टॉक'चा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली, शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध
शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार! 'बफर स्टॉक'चा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली, शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध
ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणावर अलहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी, नक्की वाद काय?
ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणावर अलहाबाद उच्च न्यायालयात आज सुनावणी, नक्की वाद काय?
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Stree 2 Who Is Sarkata : धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
Embed widget