(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेचे मोठं पद सोडलं, अजित पवारांचा निर्णय नेमका कशासाठी?
अजित पवारांनी कामाचा व्याप वाढल्यामुळे पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद आहे. त्यामुळे कामाचा व्याप वाढल्याचं बोललं जात आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक (director of pune district bank) पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे गेल्या 32 वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील 32 वर्षांपासून अजित पवार जिल्हा बँकेच्या संचालकपदी कार्यरत होते. 1991 पासून त्यांनी या बँकेच्या संचालकपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी या बॅंकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर 1 ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आणि पुण्यातील बँकेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
शेडयूल्ड अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकांचा दर्जा आहे आणि ज्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण देशभर आहे, अशाच 53 शेडयूल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये एकाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बहुतांश निकषांमध्ये पहिल्या 5 बँकांमध्ये स्थान मिळवले आहे.
1991 पासून कार्यरत....
अजित पवार 1991 पासून संचालकपदी कार्यरत आहे. त्यावेळी बॅंकेचा व्यावसाय एकूण 558 कोटी होता. त्यानंतर अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचा कारभार सुरु झाला आणि व्यावसायातदेखील भर पडली. टप्प्याटप्प्याने या व्यावसायात वाढ झाली आहे. 20 हजार 714 कोटी आजचा बॅंकेचा व्यावसाय आहे.देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांक पुणे जिल्हा बॅंकेचा आहे. यापुढेही ही बॅंक अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
अजित पवारांकडे तीन महत्वाचे पद...
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि कमाचा धडाका सुरु केला. त्यात अर्थमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपदही अजित पवारांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांवरचा कामाचा ताण वाढला. या कामाच्या व्यापामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
इतर महत्वाची बातमी-