मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Devendra Fadanvis: लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पुणे लोकसभेसाठी 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे
पुणे : राज्याच्या राजकारणात गत 2019 पासून अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये, सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा पहाटेचा शपथविधी देशभरात गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेले बंडही देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड ठरली आहे, त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करुन शरद पवारांना दिलेला दे धक्का. त्यामुळे, राजकारणात कोणीही कोणाचा शेवटपर्यंत मित्र आणि शत्रू नसतो हे सिद्ध झाले. सध्या, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) रोमांचक लढत आहे. त्याच, अनुषंगाने महायुतीचे व महाविकास आघाडीचे सर्वच नेते प्रचाराच्या मैदानात, मुलाखतींमधून जनतेशी संवाद साधत आहेत. पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी, त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पुणे लोकसभेसाठी 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पुण्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर मैदानात आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेही रिंगणात आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना फडणवीसांशी संवाद साधला असता, शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी थेट उत्तर देणे टाळले.
शरद पवारांनी दिलं होतं उत्तर
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष उदयास आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. शरद पवारांना मोठा राजकीय अनुभव असून देशाच्या राजकारणात त्यांचं मोठं स्थान आहे. त्यामुळे, भाजपासोबत 2019 मध्ये आपण चर्चा केली होती, या प्रश्नावर त्यांनी राजकारणात चर्चा ही सुरुच ठेवायची असते, असे उत्तर दिले. तर, अजित पवार पुन्हा परत आल्यास तुम्ही सोबत घ्याल का, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळी, भाजपा नको, बाकी कुणीही चालतील असे उत्तर शरद पवारांनी दिल होते. आता, याच अनुषंगाने फडणवीसांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळल्याचे दिसून आले.
फडणवीस स्पष्टच बोलले
विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास तुमचे दरवाजे उघडे असतील का?, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर देणे टाळले, राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो, त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. त्यामुळे, जर-तरच्या प्रश्नावर मी उत्तर देत नसतो, असे फडणवीसांनी म्हटले.तसेच, आत्याबाईला मिशा असत्या तर, यावर उत्तर द्यायचे नसते,असेही फडणवीसांनी म्हटले.
हेही वाचा
Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!