योगेश कदम रात्री पोलीस स्थानकात, संजय शिरसाट वसतीगृहात पोहचले; चंद्रशेखर बावनकुळेंनी इशाराच दिला; नेमकं काय घडलं?
Maharashtra Cabinet Minister: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस स्थानकास काल रात्री उशिरा अचानक भेट दिली.
Maharashtra Cabinet Minister मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या मंत्र्यांना त्यांची त्याची खाती मिळाली असून आता ते पदभार स्विकारून कामालाही लागले आहेत. अनेक मंत्री अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम या नवख्या मंत्र्यांसह मंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस स्थानकास काल रात्री उशिरा अचानक भेट दिली. ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या योगेश कदम यांनी पोलिसांना सूचना दिल्या. शाळा-कॉलेज यामध्ये वाढणारे ड्रग्स सेवनाचे गंभीर प्रकार, महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी तसेच गंभीर गुन्हे व पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच पोलिस बांधवांशी संवाद साधून सोयी सुविधांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे लवकरात लवकर गुन्हेगारी संदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा
आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन, शिफारसीद्वारे बदली करून घेता येणार नाही. कुणीही हा समज करून घेऊ नये, की हे सरकार आम्ही कसेही मॅनेज करू. देवेंद्र फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
संजय शिरसाट यांनी अचानक शासकीय वसतीगृहाला दिली भेट-
संजय शिरसाट यांनी अचानक शासकीय वसतीगृहाला भेट दिली. आर्क परिसरात असणाऱ्या शासकीय वस्तीगृहाला भेट दिली. सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वस्तीगृहाला संजय शिरसाट यांनी भेट दिली. यावेळी संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसले. लाज वाटत नाही का पैसे खायला?, हवे तर एक दिवस इथे राहून दाखवा, असं संजय शिरसाट म्हणाले. वसतीगृहाची मी पहाणी केली. जनावरं तरी राहतील का अशी स्थिती आहे. भिंती गळतायत, नळानां पाणी नाही. शासन कोरोडो रुपयांचा निधी देतंय. तरी अशी परिस्थिती आहे. बाथरुलाही काचा नाही, अशा अवस्थेत मुलांना रहावं लागतय. हे दुर्दैवी आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे.पुण्यात समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी महिला अजून आलेली नाही.दुसरी आजारी असल्याचं सांगून रजेवर आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितले.
शिरसाट, योगेश कदम ते निलेश राणे; मंत्री होताच फटकेबाजीला सुरुवात, VIDEO:
संबंधित बातमी:
खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर, मंत्रालयात सकाळपासून बैठकांचा धडाका