एक्स्प्लोर

Sanjay Shinde : फडणवीसांना घाबरता, विधानसभेत बोलले नाहीत; बाहेर आलं की आरक्षण भेटायला पाहिजे म्हणतात, मराठा तरुणांनी संजय शिंदेंना घेरले

Sanjay Shinde, Karmala : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांना मराठा तरुणाने आरक्षणाबाबत जाब विचारलाय.

Sanjay Shinde, Karmala : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना मराठा तरुणाने आरक्षणाबाबत जाब विचारलाय. संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे काम केले होते. ते अपक्ष आमदार असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. शिवाय लोकसभा निवडणुकीत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकांना हजेरी लावली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) विधानसभेत प्रश्न का मांडला ? असा थेट सवाल मराठा तरुणांने संजय शिंदेंना केलाय. 

मराठा तरुण काय काय म्हणाला?

मराठा तरुण म्हणाला, लोकसभेला उभे राहिलात तेव्हा आम्ही गावातून भरपूर मतदान केले. विधानसभेला अपक्ष उभे राहिलात, आम्ही गावातून भरपूर मतदान दिलं. पण तुम्ही सर्व गावकऱ्यांना फाट्यावर मारण्याचं काम केलं. गावात रस्त्याचा प्रश्न होता, तुमच्याकडं कागदं देऊनही तुम्ही कामं केली नाहीत. निवडणूक आली की निधी मंजूर झाला? असं कसं होतंय? आता आचारसंहिता लागू झाली. आम्ही दहा वर्ष झाली वाट पाहातोय. 

देवेंद्र फडणवीसांना घाबरतात, विधानसभेत कोणीही बोलत नाही

पुढे बोलताना मराठा तरुण म्हणाला, महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. संजयमामा म्हणजे काळजाचा आमदार समजत होतो. विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत काहीतरी बोलाल वाटलं होतं. पण तसं काहीही झालेलं नाही. एसआयटी चौकशी स्थापन झाली, कोणीही एक शब्द बोललं नाही. देवेंद्र फडणवीसांना घाबरतात, विधानसभेत कोणीही बोलत नाही. बाहेर आलं की मात्र, चार-पाच जण गोळा होतात. म्हणतात मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे. रस्त्यावर आम्ही खंबीर आहोत, तुम्ही विधानसभेत आमची बाजू मांडायला पाहिजे. दुटप्पी भूमिका आम्हाला मंजूर नाही. फसवाफसवीचं राजकारण बास झालं. विरोध असून सुद्धा कालपर्यंत आम्ही संजयमामांना मतदान केलं. पण तुम्ही आमची दखल घेत नाहीत. 

दरम्यान, संजय शिंदेंनी समोरासमोर बोलताना, मराठा समाजाच्या तरुणाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केलाय. "मी गप्पा मारत नाही. कोणाला फसवत नाही. मी तुम्हाला निधी देतो, विषयच मिटवतो", असा शब्द संजय शिंदेंनी दिलाय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Assembly Elections 2024 : राज ठाकरेंकडून 2 उमेदवारांची घोषणा, मनसेच्या दुसऱ्या यादीचाही मुहूर्त ठरला; ठाण्यातून खास शिलेदाराला संधी

Sandeep Naik : शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का, गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget