एक्स्प्लोर

केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा, शिंदे टोळीने आरशात पाहावे खरी शिवसेना कोण कळेल : संजय राऊत

दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळीने आरशात पाहावं. शिवसेना ठाकरेंची हे कोणीही सांगेल, शिंदेंना कोणीही ओळखत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबई दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Maidan) शिवसेनेच्या (Shiv Sena) कोणत्या गटाची सभा होणार यावरून यावर्षीदेखील संघर्ष सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार हे आता स्पष्ट झालंय. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केलीआहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळीने आरशात पाहावं. शिवसेना ठाकरेंची हे कोणीही सांगेल, शिंदेंना कोणीही ओळखत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

संजय राऊतांनी देखील यावरून शिंदे गटावर टीका केली आहे. सध्या कोणत्याही गटाने किंवा टोळीने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून कुणी बीएमसी किंवा सरकारकडे अर्ज केला असेल तर त्यांनी आधी स्वतःला विचारावं की आपण शिवसेना आहोत का? असा सवाल संजय राऊतांनी  केला आहे,  भाजपच्या नादी लागून लफंगेगिरी करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. जगाच्या पाठीवर जाऊन कुणालाहाी विचारा शिवसेना कुणाची ते बाळासाहेब ठाकरेंनाच ओळखतात. एकनाथ  शिंदेंना कोणीही ओळखत  नाही. आता माघार घेतली आहे. दिल्लीच्या मदतीनं पक्ष चोरला, चिन्ह चोरलं आणखी काय चोरणार आहेत. 

केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोती तलावातला डोमकावळा

केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोतीतलावातला डोमकावळा आहे. हा केवळ पदासाठी सत्तेत आला आहे. त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता, की हा सत्तेसाठी पाठी खुपसून निघून जाईल. आता आम्हाला खात्री आहे की हा शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जाईल, असे म्हणत दीपक केसरकरांवर टीका केली आहे.  

ईडीच्या धाडी विरोधकांवरच का?

राहुल कुल, क्रिस्टल घोटाळा यांच्याकडे का ईडीच्या धाडी होत नाही. ईडीच्या धाडी विरोधकांवरच का होतात अस सवाल संजय राऊतांनी केला आहे.  खरं तर शिंदे गटासोबतत जे गेले ते ईडीच्या कथीत केसेच्या भीतीने गेले आहे.  

शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्यावी : वैभव नाईक

शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊन नये आणि घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मोदी शाहांची मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचा विचार माडण्याचा कुठलाही अधिकार नाही.त्यांच्या हातात आता पक्षाची धेय्य, धोरण राहिली नाहीत तर ती भाजपच्या हातात असून शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Embed widget