Sanjay Raut : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेचं कधीही न ऐकलेलं भाषण चालवणार; संजय राऊतांनी सांगितलं ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचं वैशिष्ट्य, नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut : नाशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन लॉन्स येथे बुधवार 16 एप्रिल रोजी शिवसेना ठाकरे गटाचे एकदिवसीय निर्धार शिबीर पार पडणार आहे.

Sanjay Raut : नाशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन लॉन्स येथे बुधवार 16 एप्रिल रोजी शिवसेना ठाकरे गटाचे एकदिवसीय निर्धार शिबीर पार पडणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिबिरात मार्गदर्शन करणार असून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तर या शिबिरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे न ऐकलेले भाषण दाखविणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, 16 एप्रिल ला मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेना शिबीर होणार आहे. दिवसभर हे शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी सर्व विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येतात. अनेक विषयांवर चर्चा, मंथन, चिंतन होणार आहे. सकाळी 9.30 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
बाळासाहेब ठाकरेचं कधीही न ऐकलेलं भाषण चालवणार
सायंकाळी 6.30 वाजता उद्धव ठाकरे या शिबिरासाठी उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे हे शिबिरासाठी मार्गदर्शन करतील. अंबादास दानवे, चंद्रकात खैरे, असीम सरोदे हे देखील पदाधिकारी आणि कार्कार्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिबिरात न ऐकलेले भाषण दाखविण्यात येणार आहे. एक प्रकारे बाळासाहेब यांची या शिबिराला उपस्थिती असेल. प्रत्येक पदाधिकाऱ्याने शिबिरासाठी वाहून घेतले आहे. ठाकरे परिवार आणि नाशिकचे प्रेम असे आहे की, मुंबई बाहेरचे पहिले शिबिर नाशिकमध्ये असणार आहे. असिम सरोदे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी ते कार्य करत आहेत. त्यांचे मागर्दशन घेतले जाणार आहे, असे त्यांनी म्हटले.
नेहरू यांच्या संपत्तीवर टाच आणली जातेय
नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर लगेच नॅशनल हेरॉल्डचे संपत्ती जप्त केली. नेहरू यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. टीका झाल्यानंतर लगेच अशा कारवाया होतात. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीला क्लीन चिट देताय. दाऊदच्या संबंधित प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त केली होती. ते भाजप सोबत जाताच क्लीन चिट देण्यात आली. अजित दादा यांच्या जप्त केलेल्या संपत्तीला देखील क्लीन चिट देण्यात आली आहे. एकीकडे दाऊदची संपत्ती मुक्त करतात आणि दुसरीकडे नेहरू यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा
कोण संजय राऊत? ठाण्याच्या इस्पितळात नाव नोंद करून ठेवलंय; अमित शाहंवरील टीकेनंतर भाजपचा बोचरा पलटवार























