Sanjay Raut : मोठी बातमी: राज ठाकरेही मविआच्या नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार; संजय राऊतांची माहिती, फडणवीस, शिंदेंनाही निमंत्रण
Sanjay Raut: मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व विरोधी पक्ष नेते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

Sanjay Raut: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची 14 ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही समावेश असून, ही बैठक 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut Press Conference: काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे देखील या शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भाजपच्या देखील काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे. याव्यतिरिक्त महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आम्ही पत्र पाठवले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 11, 2025
१४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत
मा .शरद पवार,उद्धव ठाकरे,हर्षवर्धन… pic.twitter.com/KyvPNgyKL9
Sanjay Raut Post: संजय राऊत यांची पोस्ट
दरम्यान, याबाबत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. 14 ऑक्टोबर 12.30 वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























