एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar Meets Amit Shah: दिल्लीत सुधीर मुनगंटीवारांनी घेतली अमित शाहांची भेट; नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर

Sudhir Mungantiwar Meets Amit Shah: सुधीर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही सदिच्छा भेट घेतली.

Sudhir Mungantiwar Meets Amit Shah: महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केंद्रातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी झालेल्या भेटीमुळे आगामी काळात मुनगंटीवार यांना पक्षात नव्या जबाबदाऱ्या देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sudhir Mungantiwar Meets Amit Shah: अमित शाह यांच्याशी राज्यातील मुद्द्यांवर चर्चा

दिल्लीतील दौऱ्यात मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं की, "मी मंत्रीपदासाठी किंवा कोणतीही पदे मिळावीत म्हणून दिल्ली दौरा केलेला नाही. राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच या भेटी घेतल्या आहेत."

तसेच, राज्यात काही ठिकाणी द्वेषाची भावना पसरवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी यावर लक्ष द्यायचे काम गृहमंत्र्यांचे आहे. गृहमंत्री ते काम करतील. तसेच मी मंत्रिमंडळात नाही यामागे पक्षाचे आणखी काही चांगले नियोजन असेल त्यामुळे ते होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, अमित शाह यांना मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू संशोधन संस्थेत तयार केलेला विशेष तिरंगा आणि डायरी भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. 

Sudhir Mungantiwar Meets Amit Shah: राजकीय चर्चांना उधाण

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेत केवळ राज्यातील प्रश्‍नच नव्हते, तर काही राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. त्यामुळे पक्षाकडून लवकरच मुनगंटीवार यांना कोणतीतरी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Sudhir Mungantiwar Meets C P Radhakrishnan: इतर नेत्यांचीही घेतली भेट

अमित शाह यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. याशिवाय, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अजून स्पष्टता नाही.   

Sudhir Mungantiwar: राजकारणात काही मिळावे म्हणून आलेलो नाही

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार लवकरच मंत्रिमंडळात येणार का? याविषयी विचारले असता राजकारणात काही मिळावे म्हणून आलेलो नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी वगैरे मी दिल्ली दौरा केला, असे अजिबात नाही, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. 

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा, KYC न करणाऱ्यांना हप्ता मिळणार की नाही?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: 'FIR मध्येही Scam, Parth Pawar चं नाव का नाही?', Anjali Damania यांचा थेट सवाल
Superfast News Updates : 8 च्या अपडेट्स : 8 AM : 7 NOV 2025 : ABP Majha
Pune Land Scam: मामेभाऊ Digvijay Patil यांच्यावर गुन्हा, ९९% भागीदार असलेले Parth Pawar वगळले?
Pune Land Scam: 'जितका मोठा घोटाळा, तितकाच मोठा FIR स्कॅम', Anjali Dhavaniya यांचा आरोप
Metro Fare Hike : मेट्रो भाडेवाढीचा प्रस्ताव, प्रवाशांमध्ये चिंता, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
Embed widget