एक्स्प्लोर

वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार? संजय राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना थेट सवाल

Sanjay Raut : पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

Sanjay Raut मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रातील गुंड जे शिंदेंच्या पक्षात सामील होत आहेत, त्यांना मी जनतेच्या समोर आणत आहे. हे सरकार काय करत आहे? मुख्यमंत्री काय करतायेत? पुण्यात निखिल वागळे (Nikhil Wagle), असिम सरोदे (asim sarode), विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhari) यांच्यावर हल्ला झाला. पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला आहे. 

निखिल वागळेंवर हल्ला करणारे कोण गुंड आहेत? कोणत्या पक्षाचे गुंड आहेत हे? 'डर गये कमिश्नर' परेड तर त्यांची व्हायला पाहिजे होती. निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचे समर्थन करत आहेत. या हल्ला करणाऱ्यांची देखील परेड काढली पाहिजे. त्यांनाही हातात बेड्या घालून रस्त्यावर फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते, असा घणाघात त्यांनी केला आहे. 

राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणुका घ्या

कायदा सुव्यवस्था रसातळात गेली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. आम्ही सरकारच्या झुंडशाहीला आव्हान देऊ. राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणुका घ्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. सीएए बाबत संजय राऊत म्हणाले की, जे हा कायदा येईल तेव्हा त्यावर चर्चा होईल. जे देशाच्या सुरक्षेच्या हिताचे असेल. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. सीएए बाबत आम्ही आता चर्चा करणार नाही.

मुख्यमंत्री शिंदे फेकुचंद 

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस असे म्हटले.तसेच अचानक त्यांना गाजर खाऊन जाग आली का? अडीच वर्ष झोपले होते का? अशी टीका केली. यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, आता या फेकुचंदवर कोण विश्वास ठेवणार आहे. हे गुंडांचे सरदार आहेत. हे चोरांची टोळी चालवत आहेत. या मंडळाचे सरदार हे फेकुचंद आहेत. एकेकाळी करमचंद जासूसने देशात चांगले काम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावे. त्यासाठी अभ्यास आणि वाचन असावे लागते. आसपास गुंड नव्हे तर विचारवंत असावे लागतात. रोज चार गुंडांबरोबर बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. 

तुमचं कशात नाव आहे?

जे आज तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. आम्ही चांगली माणसे आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एक सभ्य, सुसंकृत, विद्वान, ज्यांचे जागतिक छायाचित्र कलेत नाव आहे. मुख्यमंत्र्यांचे कशात नाव आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

आणखी वाचा 

Farmer Protest 2.0 : देशातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत? सरकार चिंतेत, यावेळी बळीराजाची मागणी काय? जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली, सुप्रिया सुळेंचा कोकाटेंना टोला 
तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली, सुप्रिया सुळेंचा कोकाटेंना टोला 
Lalbaugcha Raja PHOTO :  लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात, पाहा फोटो
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात, पाहा फोटो
अमोल खताळ संधीचं सोनं करणारा, त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उलथवली; एकनाथ शिंदेंचे कौतुकाचे बोल, बाळासाहेब थोरातांना टोला
अमोल खताळ संधीचं सोनं करणारा, त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उलथवली; एकनाथ शिंदेंचे कौतुकाचे बोल, बाळासाहेब थोरातांना टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली, सुप्रिया सुळेंचा कोकाटेंना टोला 
तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली, सुप्रिया सुळेंचा कोकाटेंना टोला 
Lalbaugcha Raja PHOTO :  लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात, पाहा फोटो
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात, पाहा फोटो
अमोल खताळ संधीचं सोनं करणारा, त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उलथवली; एकनाथ शिंदेंचे कौतुकाचे बोल, बाळासाहेब थोरातांना टोला
अमोल खताळ संधीचं सोनं करणारा, त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उलथवली; एकनाथ शिंदेंचे कौतुकाचे बोल, बाळासाहेब थोरातांना टोला
Deepak Kedar : लक्ष्मण हाकेला हाताशी धरुन मराठा आंदोलनात दंगली घडवण्याचा प्रयत्न; दीपक केदार यांचा सरकारवर आरोप
लक्ष्मण हाकेला हाताशी धरुन मराठा आंदोलनात दंगली घडवण्याचा प्रयत्न; दीपक केदार यांचा सरकारवर आरोप
नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, पालकांनी दिला चोप, गुन्हा दाखल 
नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, पालकांनी दिला चोप, गुन्हा दाखल 
केंद्र सरकारचा 25000 कोटी रुपयांचा गेम चेंजर प्लॅन, जगाच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू अधिराज्य गाजवरणार
केंद्र सरकारचा 25000 कोटी रुपयांचा गेम चेंजर प्लॅन, जगाच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू अधिराज्य गाजवरणार
झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 221 कोटींचा खर्च, मस्ककडून 20 गार्ड तैनात; दोघांनी सुद्धा अचानक सुरक्षा का वाढवली, कोणत्या सीईओचा खर्च सर्वाधिक?
झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 221 कोटींचा खर्च, मस्ककडून 20 गार्ड तैनात; दोघांनी सुद्धा अचानक सुरक्षा का वाढवली, कोणत्या सीईओचा खर्च सर्वाधिक?
Embed widget