एक्स्प्लोर
BEST Election Result: राज ठाकरे नव्हे, टार्गेटवर फक्त उद्धव ठाकरे; बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर 'सेनाभवन'बाहेर काय घडलं?
BEST Election Result: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.
BEST Election Result
1/7

सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत 'ठाकरे ब्रँड'चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले.
2/7

महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते.
3/7

'ठाकरे ब्रँड' म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र आज पहाटे निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.
4/7

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून ठाकरे गटाला डिवचण्यात आले आहे.
5/7

दादरच्या सेनाभवन परिसरात भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
6/7

ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले.
7/7

विशेष म्हणजे भाजपने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंना डिवचल्याचे दिसून येत आहे.या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलेला नाही.
Published at : 21 Aug 2025 08:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























