एक्स्प्लोर

Sanjay Raut : मनसे-ठाकरेंच्या युतीवर पुन्हा मोठं भाष्य; राज्यात दोनच समविचारी पक्ष; संजय राऊतांच्या विधानाने उंचावल्या भुवया, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray -Uddhav Thackeray : राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसे शिवसेना युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सातत्याने सकारात्मक वक्तव्ये केली जात आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोनच समाविचारे नेते आहेत. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सध्याच्या भूमिकेवर राऊतांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाय का? असा सवाल देखील यामुळे उपस्थित झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात दोनच समाविचारी पक्ष

राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत, त्या चुकीच्या आहेत या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही. आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भूमिका ही याबाबतीत अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी. मराठी माणसांना एकत्रित राजकारण करावे, ही त्यांचे भूमिका आहे. काल अमित शहा यांच्यासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले, अशा नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचा, ही भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोनच समविचारे नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे, असंही पुढे राऊतांनी म्हटलं आहे. 

आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेने

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही आणि विचारलेलं सुद्धा नाही. कोण काय बोलत आहे, त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जो संवाद आहे किंवा जो संवाद होणार आहे, त्याच्यावर भूमिका ठरतात. आता मी काय बोलतो या क्षणी किंवा अन्य कोण काय बोलत असेल मी माझ्या पक्षामधील जी काय मानसिकता आहे ते मी सांगत आहे. आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेने चालली आहे. वीस वर्षांपूर्वी, 19 वर्षांपूर्वी, 18 वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो. पण, महाराष्ट्राची गरज म्हणून 2019 ला आम्ही एकत्र आलो. भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानीविरुद्ध आम्ही एकत्र आलो. प्रश्न इतकाच आहे आमच्याबरोबर 25 वर्ष राहिलेले लोक बेईमानी करून निघून गेले, असंही पुढे राऊतांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान दिलं

अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही महाराष्ट्रात सरकार बनवलं. संसदेत लोकशाहीत असं सरकार बनवणं हा काही अपराध नाही. देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत. काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान दिलं. भारतीय जनता पक्ष किंवा किंवा त्यांचे तेव्हाचे लोक ब्रिटीशांचे खबरी म्हणून काम करत होते. भगतसिंग यांच्या शहिदांच्या किंवा अनेक प्रमुख शहिदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते. तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्याचा लढा लढत होते. हे सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आम्ही नव्हतो, काँग्रेस होतं. तेव्हा भाजप नव्हता. काँग्रेस होतं. मतभेद काही असले तरी नरेंद्र मोदी यांनी देश उभं नाही केला. देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये गेल्या साठ वर्षात उत्तम प्रकारे उभा केला, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget