Sanjay Raut on CM Eknath Shinde : गुलाम आहोत हे स्पष्ट करा, आम्ही टीका थांबवतो, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) यांच्यावर तुफान टीका केली. भाजप म्हणजे भाषण माफिया त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे, असं राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) यांच्यावर तुफान टीका केली. आम्ही भाजपचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत .आम्ही गुलाम आहोत. हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावरती आम्ही टीका करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) यांच्या शिर्डी दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला. "निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का महाराष्ट्रात ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे. राष्ट्रपती शासन लागत आहे. काही होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार साईबाबा दर्शन घेणार भाषण करणार स्वतः ते एक बाबा आहेत", असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण सुरू आहे. मात्र यावरती कुठलाही तोडगा सरकारने काढला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार का? याअगोदर देखील मी म्हणलो होतो जरांगे यांना मोदींसमोर बसवले पाहिजे ज्या काही मागण्या आहेत त्या समोर बसून सांगितल्या पाहिजेत, असं संजय राऊतांनी सांगितलं.
भाजप म्हणजे भाषण माफिया त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे, असं राऊत म्हणाले.
नैराश्यातून महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्रात आपण हरत आहोत. जो जुगार ते खेळत होते तो हरत आहेत. एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना वारंवार बोलावे लागतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे जाऊ शकतात, असं हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहेत. या सरकारचं दिल्लीत पायपुसणे केलेलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले. मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री दिल्लीश्वरांना चहा पिऊ का पाणी पिऊ का हे विचारण्यासाठी वारंवार दिल्लीत जातात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
गुलाम आहे हे स्पष्ट करा, आम्ही टीका थांबवतो
मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला विकास राहिला बाजूला. आम्ही भाजपचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत .आम्ही गुलाम आहोत, हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावरती आम्ही टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे.आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
भाजपकडे बिनकामाचे 105 चा आकडा
भाजपकडे 105 चा आकडा असून काय वेळ आली आहे. हाजी हाजी करावं लागत आहे .बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी तिथे जाणार. एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार? इंडिया आलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
मोदींच्या कार्यक्रमात लोकांनी गाड्या परत पाठवल्या
कोणीही त्या कार्यक्रमाला सरकारी गाडीतून जाणार नाही .त्या गाड्यांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी करायला सुरू आहे. लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावं. यापूर्वी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लोक उत्स्फूर्तपणे जात होते ,मात्र आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रम बहिष्कार टाकत आहे. हे भाजपने स्वीकारायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.
VIDEO : PM Modi यांचा शिर्डी दौरा नैराश्यातून, CM Shinde भाजपचे गुलाम