एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे अजितदादांची तक्रार केली, पण संजय राठोडांनी हात झटकले, म्हणाले, 'माझ्या खात्याला निधी मिळालाय'
एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील आमदारांची खात्याला निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच या चर्चेला छेद दिला आहे

Solapur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेना मंत्री यांनी छेद दिला आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी माझ्या खात्याला निधी मिळाला आहे. निधी वाटपात कोणतीही असमानता नसल्याचं ते म्हणाले आहेत. माझ्या खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मिळाले असल्याचं मंत्री संजय राठोड म्हणाले आहेत. निधी वाटपात उन्नीसबीस होतं, मात्र त्याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष होतं किंवा खात्याला पैसेच मिळत नाहीत. असंही मंत्री राठोड म्हणालेत. (Sanjay Rathod) एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील आमदारांची खात्याला निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच या चर्चेला छेद दिला आहे. (Maharashtra Politics)
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळात लक्ष असताना पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेतील आमदारांना निधीसाठी दुजाभाव केल्याची तक्रार केल्याच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत खडखड्यात झाल्याने कर्जमाफी लाडकी बहिण योजनेची वाढीव रक्कम देण्यात राज्य सरकार असमर्थता दाखवत असल्याने महायुतीत शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा वाढली होती.
काय म्हणाले संजय राठोड?
माझ्या खात्याला प्रस्तावित निधी मिळालेला आहे. प्रत्यक्ष अनुदानही मंजूर झाले आहे. जलसंधारण खात्याला यापूर्वीही पैसे मिळाले आहेत आताही ते मिळत आहेत. मी शारदा मंत्री झालो आहे आणि पाच वेळा निवडून आलो आहे. राज्यात वेगवेगळ्या योजना चालू असतात. लाडकी बहीण योजना चालू आहे. विकासाचे प्रकल्प आहेत. त्यामुळे निधी वाटपात उन्नीसबीस होतं. मात्र याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष होतं किंवा खात्याला पैसेच मिळत नाहीत. माझ्या खात्याला निधी मिळाला आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न अधिकारी आणि प्रशासन करत आहेत. अर्थ खात्याबद्दल गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्या केल्याबाबत विचारल्यानंतर मंत्री संजय राठोड म्हणाले ,या संदर्भातील माहिती मी आता देऊ शकत नाही काय विषय आहे याची माहिती घेऊन बोलेन. मंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहांकडे केलेली अर्थ खात्याबाबतच्या तक्रारीची चर्चा सुरू असतानाच माझ्या खात्याला निधी मिळत असल्याचं मंत्री राठोड म्हणाले आहेत.
हेही वाचा:
























