Sanjay Patil : जिल्ह्यात क्षणाला रंग बदलणारा 'विशाल सरडा' तयार झालाय, संजयकाका पाटलांचा विशाल पाटलांवर हल्लाबोल
Sanjay Patil : सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केलीये.
Sanjay Patil, सांगली : माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) आणि विद्यमान खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपली आहे. कवठेमहांकाळमधील निषेध सभेत खासदार विशाल पाटलांनी संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या वरती जोरदार टीका केली होती. त्याला संजयकाका यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यात क्षणाला रंग बदलणारा 'विशाल सरडा' तयार झाल्याचे सांगत संजयकाका पाटील विशाल पाटील यांच्यावर शाब्दिक प्रहार केला आहे.
संजयकाका पाटील काय काय म्हणाले ?
जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरघोड्या करून अपघाताने झालेला खासदार, रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सरडा जिल्ह्यात तयार झाला आहे. निवडणुकीनंतर या खासदारांनी शंभर दिवसात काहीच काम केलं नाही. दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन बेताल आणि भंपक वक्तव्य करणं फक्त लोकांच्यात भांडणे लावणे यांच्याशिवाय दुसरा उद्योग याने केला नाही. बेगाणे शादी में अब्दुल्ला दिवाणा अशी अवस्था याची आहे, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे केले, संजयकाकांचा आरोप
पुढे बोलतना संजयकाका पाटील म्हणाले, अतिशय भामटेगिरी आणि बेताल वागणारा माणूस म्हणजे विशाल पाटील असल्याची घणाघाती टीका माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केली. वसंतदादा घराण्यातील 40 वर्षांची कामे आणि माझ्या दहा वर्षांची कामे त्यांना खुलले आव्हान आहे एका स्टेजवर येऊन त्याचा हिशोब मांडू असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले. सहकारी संस्था मोडून खान आणि भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे केले. आता हे आता बाहेर काढणार असल्याचा इशारा संजयकाका पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
सध्याच्या घडीला राजकीय जीवनात काम करत असत असताना एखाद्या माणसाला पद आणि प्रतिष्ठा मिळाली की, माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतो, त्यामुळे माणसं बेफाम होत असतात. अशा लोकांना कामासाठी पद दिलेले असते, याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असंही संजयकाका पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या