एक्स्प्लोर

सगळेच राजहट्ट पुरवले जाणार नाहीत, मंडलिकांचा शाहू महाराजांवर पहिला वार, सतेज पाटलांना म्हणाले, खासदारकी घरी वापरायची आहे का?

Sanjay Mandlik on Shahu Maharaj, Kolhapur : सतेज पाटील (Satej Patil) तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो? 2026 पर्यंत संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असं म्हटला होतात.

Sanjay Mandlik on Shahu Maharaj, Kolhapur : “सतेज पाटील (Satej Patil) तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो? 2026 पर्यंत संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असं म्हटला होतात. तुम्हालाच निवडणुकीला उभा राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना गळ घातली. कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने ते आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आहे. पण सगळे राजहट्ट पुरवायला कोल्हापूरची जनता पूर्ण करणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्यापद्धतीने सगळं होणार आहे”, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)म्हणाले. 

कोल्हापूरमध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे हे उपस्थित होते. महायुतीच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अबकी बार चारसो पार हा निर्धार करण्यात आला.

सतेज पाटील यांना ही खासदारकी आपल्या घरात वापरायची आहे

संजय मंडलिक म्हणाले, सतेज पाटील काल म्हणाले की प्रत्येक तालुक्यात एक संपर्क कार्यालय काढणार आहे. मला वाटतं त्यांना अजिंक्यतारा या कार्यालयाच्या शाखा काढायच्या आहेत. सतेज पाटील यांना ही खासदारकी आपल्या घरात वापरायची आहे. खासदार-आमदार, गोकुळ चेअरमन आपल्या घरातील नोकर आहेत अशा पद्धतीने ही मंडळी वागत आहेत. मी कालपर्यंत पुरोगामी होतो आज अचानक त्यांना मी प्रतिगामी दिसू लागलो. 
कोल्हापुरात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाहू विचारांचा आहे. इथल्या पाण्यामध्ये, इथल्या मातीमध्ये, इथल्या डीएनएमध्ये शाहू विचार आहेत.

ज्या पद्धतीच्या बोरी त्या पद्धतीच्या बाभळी 

पुढे बोलताना मंडलिक म्हणाले, शाहू महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे प्रत्येक घरात पुरोगामी विचार दिला. आता निवडणुकीला उभा राहिलेल्या वारसदाराने देखील सांगितलं पाहिजे त्यांनी काय काम केलं. थेट पाईपलाईनचे पाणी आणले म्हणतात संपूर्ण कोल्हापूरकर म्हणत आहेत एकट्यानेच अभ्यंग स्नान केले. आम्हाला देखील कुणावर टीका करण्यात रस नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्ही देखील कोल्हापूरकर आहोत. हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्या पद्धतीच्या बोरी त्या पद्धतीच्या बाभळी इथे असणार आहेत, हे आमच्या मित्रांनी लक्षात ठेवावं, असंही संजय मंडलिक म्हणाले. 

तुझ्या पोटात का दुखतं बाबा? 

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये विरोधाभास आहे. सतेज पाटील भेद निर्माण करण्यात फार हुशार आहेत. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे मांडीला मांडी लावून कसे बसतात असं सतेज पाटील म्हणतात, तुझ्या पोटात का दुखतं बाबा? एका घरात भांडण झालं, मारामारी झाली की परत एकत्र यायचं नाही का?  सतेज पाटील तुम्ही आतापर्यंत फूट पाडण्याचेच काम केलं आहे. त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली की तुम्ही घाबरता.  कारण फूट पडलेल्या माणसांमुळेच तुम्ही विजयी होता. राजकारण कायमस्वरूपी दुष्मनीच बनलं हे काही बरोबर नाही. एकत्र बसून मिटवून घेणं हे आमच्या जिल्ह्यात काही जणांना नको आहे. जितकी दुकानं जास्त तितका जास्त फायदा असं गणित असतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Raju Shetti : निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार; सत्यजित पाटलांचे वडिल 20 वर्षे कारखान्याचे उपाध्यक्ष; राजू शेट्टींचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget