एक्स्प्लोर

... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन

अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे.

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातप्रकरणी (Ashok kharat) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात निवेदन दिले. दुसरीकडे अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अशोक खरातचा मुक्का 29 मार्चपर्यंत एसआयटीच्या पोलीस कोठडीतच असणार आहे. आणखी सखोल तपास गरजेचा असल्याने, खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याने ही कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या संस्थेवरील सदस्यांचीही चौकशी होईल, असे सांगितले. त्यामुळे, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांचीही चौकशी होणार आहे.   

अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्र्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील देण्यात आलं. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. या फोटोनंतर सोशल मीडियातून, विरोधी पक्षातील महिला नेत्यांनीही रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकर यांनीही आपला राजीनामा दिला असून आता त्यांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे. कारण, शिवनिका संस्थेवर सदस्य असलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये, रुपाली चाकणकर ह्या देखील सदस्य पदाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.  

ईशान्येश्वर मंदिराच्या संपत्ती वाढ

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याचे अनेक काळे कारनामे समोर आले. महिलांचे लैंगिक शोषण करत असतानाच मोठी माया देखील या भोंदूबाबाने जमवली आहे. 2009 मध्ये स्थापन केलेल्या शिवनिका संस्थानचा कारभार आता तपासण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या शिवनिका संस्थान 2025 पर्यंत कोट्यधीश झालंच कसं हा प्रश्न आता समोर येतोय. या संस्थांनवर 2009 पासून असणाऱ्या विश्वस्त मंडळासह आजपर्यंतच्या सर्वच कार्यकारी मंडळाची चौकशी झाली तरच सगळे स्पष्ट होईल. 

हेही वाचा

नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget