एक्स्प्लोर

Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Ashok Kharat Property : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या संपत्तीचा सर्व तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी विधानसभेत मांडला.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणी निवेदन केलं. भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली. एसआयटीद्वारे अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अशोक खरातच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे आणि त्याची जमीन कुठं आहे यासंदर्भातील माहिती पोलिसांनी घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Ashok Kharat Propety : अशोक खरात याची संपत्ती किती?  

मिरगाव, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे अशोक खरातच्या नावावर 33 एकर जमीन आहे. मिरगाव येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव, गवळाणे गाव तालुका  जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन खरातच्या नावावर आहे. सिन्नर, तालुका सिन्नर येथे  6 एकर जमीन,शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथे अशोक खरातच्या नावावर साडे चार एकर जमीन आहे.  

काकडी, तालुका राहाता, शिर्डी विमानतळ येथे 5.5 एकर जमीन आणि पाथर्डी फाटा नाशिक येथे 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट अशोक खरातच्या नावावर आहे. ओझर जिल्हा नाशिक येथे चार गुंठ्याचे तीन प्लॉट,आडगाव ता. जिल्हा नाशिक येथे 5 गुंठ्याचा प्लॉट अशोक खरातच्या नावावर आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

भोंदू अशोक खरातच्या नावावर पनवेल, नवी मुंबई येथे 40 गुंठे फ्लॅट आहे. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे 180 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे. संगमनेर, पुणे येथे मुलीच्या नावावार प्लॉट आहे. शिर्डी तालुका राहता येथे साई सिल्वर ओक भागीदारीत मंगलकार्य आहे. सिन्नर, ता. सिन्नर येथे पाच जणात मिळून सहा एकर जमीन आहे. अशोक खरातकडे 12 तोळे सोने आणि पत्नीच्या नावे 20 तोळे सोने आहे. पत्नीच्या नावे डीमॅट खात्यात 1 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   

आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या ⁠नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पोलिसांना या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. ⁠डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  शिवनिका संस्थान मिरगाव, ता. सिन्नर, जिल्हा नाशिक या संस्थेच्या संचालक मंडळाची चौकशी करण्यात येत आहे, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले. दरम्यान, अशोक खरात याला नाशिक कोर्टानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget