Rohit Pawar: शरद पवार मुद्दाम आजारी पडले? अजितदादांचा हा विचार हास्यास्पद; रोहित पवारांचं प्रत्युत्तर
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदान सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार द्वंद्व सुरु होते. शरद पवार मतदानापूर्वी आजारी पडले होते.
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवार यांना वाटत असेल तर त्यांचा हा विचार हास्यास्पद आहे, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या 20 दिवसांमध्ये 52 सभा घेतल्या आहेत. कधी कधी तर त्यांनी एका दिवसात तीन सभा घेतल्या आहेत, दिवसाला 25 बैठका घेतल्या आहेत. या काळात त्यांनी फक्त चार तासांची झोप मिळायची, ते ८४ वर्षांचे आहेत. याउलट अजित पवार कुठे होते तर सोसासटी, गल्ली आणि गावांमध्ये. त्याठिकाणी अजितदादांना कदाचित आरामही मिळाला असेल. पण शरद पवारांना कुठे आराम मिळाला? त्यामुळे शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवारांना वाटत असेल तर त्यांचा विचार हास्यास्पद आहे. हे बदललेले अजित पवार कोणालाही ओळखू न येणारे आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
बोटाला मतदानाची शाई लागताच अजितदादांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली, म्हणाले...
अजितदादांना साहेबांनी पद दिलं नसतं तर विकास कसा केला असता; रोहित पवारांचा सवाल
अजित पवार सतत विकासाच्या बाता करतात. पण विकास कोणी केला? 2014 पर्यंत जर शरद पवारांनी सत्ताच मिळवून दिली नसती तर अजित पवारांना पद कसं मिळालं असतं, मग त्यांनी विकास कसा केला असता? त्यामुळे विकास कोणी केला, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आता दादांना अहंकार आणि मीपणा आला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
दत्ता भरणेंवर रोहित पवारांची टीका
दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केलेला तो व्यक्ती बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे. परंतु तो तिथेच राहतो. दत्ता भरणे जर त्या कर्मचाऱ्यावर आरोप करताहेत तर व्हिडिओ दाखवा, पुरावे दाखवा. अजितदादांनीच हजारो कार्यकर्ते बाहेरून, कारखान्याचे कर्मचारी आणले आहेत. अजितदादांनीच हजारो कार्यकर्ते बाहेरून, कारखान्याचे कर्मचारी आणले आहेत. दत्तामामा खोटं बोलतात. स्वतः आई बहिणीवर शिव्या देतात. आम्ही तो व्हिडिओ सुद्धा दिला आहे. बारामतीमध्ये सध्या टेन्स वातावरण आहे. बुथवर ताबा मारण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो, अशी तक्रार आम्ही दिली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा