Rohit Pawar : तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही हे पवार साहेबांचे शब्द होते; रोहित पवार रडले अन् बारामतीच्या मैदानात सन्नाटा
रोहित पवार यांनी सांगितले की पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या.
![Rohit Pawar : तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही हे पवार साहेबांचे शब्द होते; रोहित पवार रडले अन् बारामतीच्या मैदानात सन्नाटा Rohit pawar says Sharad Pawar told us not to worry I will not close my eyes until I create a new generation that fights with self respect baramati loksabha Rohit Pawar : तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही हे पवार साहेबांचे शब्द होते; रोहित पवार रडले अन् बारामतीच्या मैदानात सन्नाटा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/9e8f0b3421ba5c5673bb2dc0a0c38eb51714909202332736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : अवघ्या राज्याचे नव्हे, देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज बारामतीमध्ये प्रथमच दोन सभा होत आहेत. एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा होत आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार पक्षाची सांगता सभा होत आहे.
या सभेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटासह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. मात्र, या सभेमध्ये बोलताना पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांची स्थिती काय होती ते सांगताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. रोहित पवार यांनी सांगितले की पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं.
जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, असे रोहित पवार यांनी सभेमध्ये सांगताच एकच सन्नाटा पसरला. हा प्रसंग सांगत असतानाच रोहित पवार यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले व परत पुन्हा असे शब्द वापरू नका, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांसमक्ष दिली. रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर मैदानात सन्नाटा पसरला गेला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)