Rohit Pawar : अजित पवार एकटे पडलेत, उद्या त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल; रोहित पवारांचा खोचक टोला
अजित पवार एकटे पडलेत, म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. उद्या त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल. असा खोचक टोला रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Rohit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) एकटे पडलेत, म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे? हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत? हा ही प्रश्न आहे. तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat elections) देखील लक्ष घालाव लागेल. असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांना लगावला आहे. अजित पवार राष्ट्रीय नेते आहेत. तरी त्यांचा जीव कारखाना निवडणुकीत अडकला आहे? तुमचा पक्ष कारखाना निवडणुकीत कुठेच दिसत नाही? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
दरम्यान, आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही, याबाबत मी बोलणार नाही. कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी नाही. माझ्या माहितीनुसार 13 तारीख अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचा पैनल निवडणुकीत नाही, असं अजिबात नाही. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून एक पॅनेल उभा करत आहेत, अशी माहितीही यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली.
अजित पवार परखड आहेत, तिजोरीत पैसा नसेल तर ते बोलतील
दिल्लीमधे नेतृत्व करणाऱ्या गटनेत्या म्हणून सुप्रिया सुळे काम पाहतात. आज किंवा उद्या त्या भारतात येतील. त्या इथ नसल्यामुळे बैठकीला उपस्थित नव्हत्या. सुप्रिया सुळे दिल्लीतील सगळा निर्णय घेत असतात. त्या येईपर्यंत कोणी निर्णय घेऊ शकणार नाही. दरम्यान, अजित पवार परखड आहेत. राज्याच्या तिजोरीत पैसा नसेल तर तसं ते बोलून दाखवतात. इथ काही नेत्याना मात्र कंत्राटातून पैसे काढायचे आहेत. कृषी विभागाचे मंत्री केवळ बोलतात, करत काहीच नाही. केवळ जॅकेटे बदलत आहेत. असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही. मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोकं तुटून पडतात. त्यामुळे अजित पवार एकटे पडले आहेत. असेही ते म्हणाले.
अजित पवार जर एकटे पडले असतील तर एका पवारांना साथ द्यायला दुसरे पवार जातील का? असा प्रश्न रोहित पवार यांना केला असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात देखील पवार आहेत. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आहे. अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या



















