Rohit Pawar: ...तर हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल, थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Rohit Pawar : रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे.

Rohit Pawar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Allegation) यांनी काही गंभीर आरोप करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली. हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का? असा संतप्त सवाल आमदार रोहित पवारांनी केला आहे.
Rohit Pawar: ...तर राज्याची पोलीस यंत्रणा केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठीच का?
शिक्षकावर आज आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली असताना त्याची साधी सखल हि घ्यायची नसेल तर राज्याची पोलीस यंत्रणा केवळ सरकारमधील नेत्यांच्या वसुलीच्या कामासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरली जाणार का? असं तरी एकदा सरकारने जाहीर करावं. असेही रोहित पवार म्हणाले. माझी पोलिसांना विनंती आहे की, या प्रकरणाची शहानिशा करुन योग्य कारवाई करावी. अशी मागणी ही त्यांनी केलीय. त्यामुळे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली… हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे ‘सद्रक्षणाय… pic.twitter.com/mWwBNM6wDk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 26, 2025
Praniti Shinde : 'महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेंव्हा मुख्यमंत्री हात वर करतात'
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर, 'महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा फडणवीसांनी हात वर केले,' असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी महिला खासदारावर टीका करण्यात वेळ घालवला, पण महिलांना संरक्षण देण्यात ते अपयशी ठरले आहेत, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप सुसाईड नोटमध्ये असल्याने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























