एक्स्प्लोर

Rohit Pawar: पोलिसांना म्हणाले, शहाणपणा करु नका, आवाज खाली; आता रोहित पवारांविरुद्ध गुन्हा दाखल

Rohit Pawar: रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा काल (19 जुलै) दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

नेमकं प्रकरण काय?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला. विधिमंडळात दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक खटके उडत असतानाच, 17 जुलै रोजी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली.

शहाणपण करू नका, हात खाली; रोहित पवार पोलिसांना काय म्हणाले होते?

नितीन देशमुख याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार रोहित पवार देखील आव्हाडांसोबत उपस्थित होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर रोहित पवारही संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना म्हणाले की, "हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका," असे रोहित पवारांनी म्हटले होते.  

सदर प्रकरणावर रोहित पवार काय म्हणाले?

आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केल्यावर मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्याच्या अनुषंगाने नितीन देशमुख यांच्या भेटीची आम्ही मागणी केली असता पोलिसांनी चार पाच वेगवेगळया पोलीस स्टेशनला 3 ते 4 तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच आव्हाड साहेबांना देखील हातवारे करत अपमानस्पद वागणूक दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पोलीस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलीस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची? राजकीय आदेशाने वागणारे पोलीस लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?, असं रोहित पवार म्हणाले. 

ही बातमीही वाचा:

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण! रोहित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget