एक्स्प्लोर

Rohini Khadse : भाजपने तुषार भोसले हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय? रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse On Tushar Bhosale : वारकरी संप्रदायावरून सुरू झालेल्या वादात रोहिणी खडसे यांनी भाजपचे तुषार भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

जळगाव : वारकरी संप्रदायावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे तुषार भोसले यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी 'हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय?' असा सवाल उपस्थित केला.

काही लोक वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन समाजात द्वेष आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःला ‘आचार्य’ म्हणवून घेणाऱ्यांना ही पदवी कोणी दिली, याचा तपास व्हायला हवा, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी तुषार भोसले यांच्यावर टीका केली. 

Rohini Khadse On Tushar Bhosale : काय म्हटलंय रोहिणी खडसे यांनी? 

खरंतर पवार साहेबांनी अशाच लबाड लांडग्यांवर टीका केली आहे. जे वारकरी संप्रदायाचं पांघरूण घालून समाजासमाजात, जातीपातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करतात. मागे एकदा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने नथुराम गोडसे होऊन थोरात साहेबांची हत्या करण्याची धमकी दिली होती. 

या विचाराला वारकरी संप्रदायात स्थान नाही आणि तरीही वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन कोणी द्वेष, व्याभिचार पसरवत असेल तर त्याला तिथे रोखण्याचे काम आम्ही संत मुक्ताबाई, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे वैचारिक वारस म्हणून करू. कारण आम्ही पिढ्यानपिढ्याचे वारकरी आहोत.

Sharad Pawar Statement : शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचा मुद्दा पवारांनी मांडला होता, तो योग्य असल्याचं मिटकरी म्हणाले. पवारांनी मांडलेली 60 टक्क्यांची आकडेवारीही कमीच असून प्रत्यक्षात ही संख्या अधिक असू शकते, असा दावा मिटकरींनी केला. 

Sharad Pawar On Warkari Sampraday : काय म्हणाले होते शरद पवार?

वारकरी संप्रदायात काही ठिकाणी प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचं मत शरद पवारांनी मांडलं. तसंच वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवारांनी एक लेख लिहिला असून त्यामध्ये हे मत मांडण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget