एक्स्प्लोर

Ratnagiri Sindhudurg lok sabha: मोठी बातमी: रत्नागिरी-सिंधुदुर्गात रात्रीस खेळ चाले, उत्तररात्री उदय सामंत-नारायण राणेंची गुप्त भेट

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदे गटातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन सुरु असलेला वाद आणखीनच चिघळला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्ग: महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी कल्याण, ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चार मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या चारही मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र, आता या मतदारसंघांवर भाजपकडून दावा सांगितला जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. यापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मतदारसंघाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. 

या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे किरण सामंत (Kiran Samant) आणि भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) इच्छूक आहेत. मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या मतदारसंघावरील आपला दावा सोडला होता. मात्र, सकाळ उजाडेपर्यंत किरण सामंत यांची भूमिका पुन्हा बदलली होती. त्यांनी रात्री टाकलेली सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली होती. तसेच किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनीही आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केले होते. 

या सगळ्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन सुरु असलेला वाद आणखीनच चिघळला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी ज्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती त्यादरम्यान नारायण राणे आणि उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचे सांगितले जाते.

मंगळवारी उत्तररात्री दीड ते दोनच्या सुमारास हे दोन्ही नेते एकमेकांना गुप्तपणे भेटले. उदय सामंत हे मंगळवारी नागपूरमध्ये होते. परंतु, नारायण राणे यांना भेटण्यासाठी ते मध्यरात्रीनंतर सिंधुदुर्गात दाखल झाले. याठिकाणी उदय सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर उदय सामंत हे मुंबईला रवाना झाले होते. तसेच उदय सामंत यांनी मंगळवारी सिंधुदुर्गात झालेल्या महायुतीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. मात्र, आता नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान नेमकं  काय घडलं, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

किरण सामंतांनी भावनेच्या भरात ते ट्विट केले होते, उदय सामंतांचा यू-टर्न

किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट करुन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच सामंत बंधुंनी या भूमिकेवरुन घुमजाव केले होते. याविषयी बोलताना उदय सामंत यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती.त्यांनी म्हटले होते की, किरण सामंत हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत, ते भावनिक आहेत, एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती, मात्र यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच मतदारांची भावना, जनभावना लक्षात घेऊन किरण सामंत यांच्याजवळ आपण बोललो आहोत. शिवसेनेकडून आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे आजही आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच मात्र मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार घेतली: उदय सामंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget