Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, कारवाईची टांगती तलवार असताना भेटीनं चर्चा
Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो शेअर केलेला आहे.

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्षांकडून पक्ष विरोधी कारवाई प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. पक्षविरोधी केल्या प्रकरणी ती नोटीस देण्यात आली होती, त्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून उत्तर देण्यात आलं होतं. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला होता.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना तलवार भेट
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून तलवार देखील भेट देण्यात आली आहे. काल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा सोशल मीडियावर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे दोन दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची माहिती आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या भेटीसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करताना राज्याचे लोकप्रिय, कर्तबगार मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांची आज सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांना भगवान श्री विष्णूच्या दशावतारचे प्रतिबिंब असणारी तलवार भेट म्हणून दिली,असं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याची तक्रार त्यांच्या विरुद्ध भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती. राम सातपुते यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिलं होतं.
कारवाईची टांगती तलवार असताना भेटीमुळं चर्चा
भाजपकडून पक्षविरोधी कारवाई संदर्भात कारणे दाखवा नोटीस रणजितसिंह मोहिते पाटील यांना बजावण्यात आली होती. त्याला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तर दिलं होतं. भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या बाबत काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरणार आहे.
इतर बातम्या :



















