एक्स्प्लोर

Anil Parab and Ramdas Kadam: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, अनिल परब यांचा हल्लाबोल

Anil Parab and Ramdas Kadam: रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाला ठाकरे गटाच्या अनिल परब यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा.

Anil Parab and Ramdas Kadam: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांची जोरदार हल्ला चढवला आहे. रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब (Anil Parab) यांनी केली. 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिहे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला. याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटतं नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होती. त्यामुळं ही जबाबदारी माझ्याकडे होतो. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो. आता 14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी का केली नाही. गेली 12 वर्षे का तोंड बंद होतं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा आहे. बाळासाहेब यांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का? त्याला जे काय कुणी सांगितलं आहे ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. कुठलाही मृतदेह दोन दिवस शव पेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी हे शक्य नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.

Ramdas Kadam: लोकांच्या जमिनी खाल्ल्या, पुतण्याने आत्महत्या का केली? अनिल परबांचा सवाल

रामदास कदम यांचे 100 अपराध झालेले आहेत, ज्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे, मुख्यमंत्री का वाचवत आहेत? अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवत आहात. एवढे अपराध, डान्सबार चालवतात, वाळूचोर आहेत, दादागिरी करताय, जमिनी लाटतायंत, माझ्याकडे सगळी प्रकरणे आली आहेत. कोणाकोणाच्या जमिनी, घरे, यांनी खाल्ली आहेत. कोणाकोणाला दादागिरी करुन बेघर केलेले आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या का केली? याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे, त्याचे देखील कारण बाहेर आलं पाहिजे, अशी मागणीही अनिल परब यांनी केले.

आणखी वाचा

बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget