एक्स्प्लोर

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे; रामदास कदम यांचा हल्लाबोल, मुंबईतील सावली बारवरही बोलले!

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं, हे उद्धव ठाकरेंना विचारा. मला सगळं माहितीय, मी सांगेन, असंही रामदास कदम म्हणाले. 

उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नको नको ते म्हणायचं आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा, माझ्या मुलाला दिशा सालियन प्रकरणातून वाचवा, असं म्हणायचं, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला. 

मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसतं- रामदास कदम

आम्हाला भाजपमध्ये घ्या...आमची तयारी आहे. एकनाथ शिंदेंचं राजकारण संपवा, म्हणजे मी भाजपमध्ये येतो, अशा अटी आणि शर्ती टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून सुरु आहे, असा दावाही रामदास कदम यांनी केला. मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसतं, असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत- रामदास कदम

राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत 12 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणा रामदास कदम यांनी साधला. तसेच मुंबईतील सावली बार प्रकरणावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोटी माहिती दिली. रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डान्सबार कधीही चालवले नाही. आम्ही लोकांचे संसार उद्धवस्त केले नाही, तर आम्ही लोकांचे संसार वाचवले. आमचं डान्सबार असल्याचं सांगत अनिल परब विधानसभेत खोटी माहिती देतायत. मी त्यांचा निषेध करतो, असंही रामदास कदम यांनी सांगितले. 

अनिल परब यांचा नेमका आरोप काय?

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे अनिल परब यांनी म्हटले. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती. 

संबंधित बातमी:

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच काही बारबाला अश्लील...; FIR मध्ये नेमकं काय काय?

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
Embed widget