एक्स्प्लोर

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच काही बारबाला अश्लील...; FIR मध्ये नेमकं काय काय?

Ramdas Kadam On Savali Bar Mumbai: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबई सावली बारचा परवाना असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता.

Ramdas Kadam On Savali Bar Mumbai: गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर विधान परिषदेत काल (18 जुलै) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता. 

एबीपी माझाने या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी सावली बारचा आढावा घेतला. या आढाव्यात माझाच्या हाती एफआयआरची कॉपी लागली आहे. हा बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्यानावे असल्याचा जबाब मॅनेजरने दिला होता. 30 मे या दिवशी या बारवर रात्री पोलिसांनी कारवाई केली. अश्लील नृत्य प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. एफआयआर कॉपीमध्ये नमूद माहितीनुसार 22 बारबाला, 25 ग्राहक, वेटर  कॅशियर आणि मॅनेजरला या छापेमारी मध्ये ताब्यात घेण्यात आला.

कदमांच्या बारवर धाड, एफआयआरमध्ये काय काय? 

1. कांदिवलीत 'सावली बार' वर  30 मे 2025 रोजी धाड

2. सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने

3. 30 मे च्या रात्री 10.50 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बार वर धाड

4. धाडीवेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी

5. काही बार बाला आणि ग्राहक अश्लील नृत्यात करत असल्याचे निदर्शनास

6. छाप्यानंतर वेटर,कॅशियर आणि मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

7. बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असा मॅनेजरचा जबाब

8. धाडीनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

9. धाडीनंतर म्हणजे 31 मे पासून सावली बार बंद 

रामदास कदम काय म्हणाले?

'सावली बार' माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा आहे, अशी कबूली माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली. बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच आहे. नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते, असं रामदास कदम म्हणाले. करारानुसार बारमध्ये काही झाल्यास चालवणाराच जबाबदार, असं रामदास कदम यांनी सांगितले. माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का?, अनिल परब अर्धवट ज्ञान असलेले वकील, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

अनिल परब यांचा नेमका आरोप काय?

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे अनिल परब यांनी म्हटले. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती. 

सावली बारमध्ये कधी झाली होती कारवाई?, VIDEO:

संबंधित बातमी:

Anil Parab on Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, 22 बारबाला पकडल्या, अनिल परबांचा खळबळजनक आरोप

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget