Ramdas Athawale : रामदास आठवले मंत्रिपदाची हॅटट्रिक करणार;कॅबिनेटचे आश्वासन पण राज्यमंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती
Ramdas Athawale, Delhi : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ramdas Athawale, Delhi : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रामदास आठवले (Ramdas Athawale) मंत्रिपदाची हॅटट्रीक करणार असे बोलले जात आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण सध्या राज्यमंत्री पद मिळणार , अशी सूत्रांची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी आठवलेंकडून मंत्रिपदाची मागणी
काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) एनडीएकडे काही मागण्या केल्या होत्या. "महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला. यावेळी मला कॅबिनेट मंत्री मिळाले पाहिजे. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे", असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले दोन जागा लढवण्यासाठी आग्रही होती. मात्र, महायुतीकडून (Mahayuti) त्यांना एकही जागा देण्यात आली नव्हती. शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघातून स्वत: निवडणूक लढण्याची रामदास आठवलेंनी मागणी केली होती. मात्र, जागा खेचून आणण्यात त्यांना अपयश आले होते.
गेल्या 10 वर्षांपासून रामदास आठवलेंकडे राज्यमंत्रिपद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात राज्यमंत्री आहेत. मोदी सरकारने दहा वर्षांच्या काळात त्यांना सामाजकि न्याय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता रामदास आठवलेंनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची मागणी केली आहे. यावेळी त्यांना कोणत्या पदाची जबाबदरी दिली जाते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपच्या 63 जागा घटल्या, मित्र पक्षांचे महत्व वाढले
लोकसभा निवडणुकीत भाजपला गेल्या दोन निवडणुकीप्रमाणे मिळाले तसे यश मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे जवळपास 63 जागांची घट झाली आहे. शिवाय, भाजपला यावेळी स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. यामध्ये जनता दल (संयुक्त) चे नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या