एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती, पुरंदरचा तह करुन पुन्हा सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, Mumbai : "लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे"

Devendra Fadnavis, Mumbai : "लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्टॅटेजी होती. मी अमित शाह यांना भेटून आलो, त्यांना काय डोक्यात आहे ते सांगितलं. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत भाजपची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

नरेंद्र मोदींनी नेहरुंची बरोबरी केली 

देवेंद्र फडणवीस म्हणाले,कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणण्याचे रेकॉर्ड यापूर्वी केवळ नेहरुंच्या नावावर आहे. त्यांची बरोबरी आता नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लोकांनी मोदीजी आणि एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आपल्याला रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्वाची आहे. महायुतीचे सरकार पुन्हा कसं आणता येईल. यासाठी प्रयत्न करुयात, असं आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवत

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसा आनंद आहे, तशीच मनात सल आहे. 2014 आणि 2019 ला आपण जो सिंहाचा वाटा उचलला होता तो आता आपण उचलला नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा रणनीती ठरवता यावी यासाठी आजची बैठक आहे. 
पराभवाची कारणे शोधून ती कशी दूर करता येईल यासाठी आज निर्धार केला. उन्हाळा संपत आहे काहीली पण संपत आहे.पावसाळा जवळ आलाय . पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवत.  आपण नव्याने पेरण्याची वेळ आलेली आहे. 

अपयशाची जबाबदारी माझ्यावर आहे, राजकीय गणितात आम्ही कमी पडलो

भाजपचे नेतृत्व मी करत असल्याने मी सांगितले या अपयशाची जबाबदारी माझी आहे. मी दोन्ही अध्यक्ष यांचे आभार मानतो. अर्थ मॅटिकमध्ये आपण कमी पडलो. मी म्हणालो की मला काम करण्याची संधी द्या. या निवडणुकीमध्ये भाजपचे नेतृत्व मी करत असल्यामुळे अपयशाची जबाबदारी माझ्यावर आहे. राजकीय गणितात आम्ही कमी पडलो. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करेन. सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं. मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असंही देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

BJP Meeting : पवार साहेबांनाही वाटत होतं त्यांचे 4 पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, हा निकाल सुखावह नाही: आशिष शेलार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget