हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही; रामदास आठवलेंचं रोखठोक मत, भाजपच्या नेत्यालाही फटकारलं
Ramdas Athawale, नवी दिल्ली : हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही. हेगडे वैगरे सारखे लोक स्टेटमेंट देत असतात. ते त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे,
Ramdas Athawale, नवी दिल्ली : हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही. हेगडे वैगरे सारखे लोक स्टेटमेंट देत असतात. ते त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनाही फटकरालं आहे. राजधानी दिल्लीत (Delhi)आज रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारच्या काळात विकास झालाय
रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, आजच्या आरपीआयच्या बैठकीत देशात एनडीए आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 राज्याचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मोदी सरकारच्या काळात विकास झालाय. महिलांना आरक्षण दिलं, कलम 370 रद्द करण्यात आलं. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक होत आहे, असंही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नमूद केलं.
राहुल गांधी भारत जोडो नाही तर भारत तोडायला निघाले आहेत
दलितांचं आणि आदिवासींसाठीचं बजेट सरकारने वाढवलं आहे. आमचा एनडीए सोबत पाठींबा आहे. आम्हाला किमान शिर्डीची जागा मिळावी, अशी मागणी देखील आम्ही केली आहे. संविधान बदलण्याची भाषा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. राहुल गांधी भारत जोडो नाही तर भारत तोडायला निघाले आहेत, असा आरोपही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघावर रामदास आठवलेंचा दावा
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पण या जागेवर सध्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे (Sadhashiv Lokhande) हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वाट्यालाच येण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेवरुन मला लोकसभा निवडणूक लढवू द्या. माझी राज्यसभेतील आणखी दोन वर्षांची टर्म बाकी आहे. त्याठिकाणी सदाशिव लोखंडे यांना राज्यसभेवर पाठवावे, असा प्रस्ताव रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या